आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharjah Hospitals Report 70% Spike In Patient Visits After Iftar ‎

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतत उपवासामुळे आजारी पडण्याचा धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारजा - श्रद्धेपोटी सतत उपवास करणा-यांची संख्या भारतात जास्त आहे. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. यापैकी बहुतांश लोक एकदाच गरजेपेक्षा जास्त खाण्यामुळे तसेच काही जण वेळेवर न खाण्यामुळे आजारी पडतात.
शारजामधील दोन रुग्णालयांत अचानकपणे रुग्णांची संख्या वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी अभ्यास करण्यात आला. अध्ययनानंतर हाती आलेल्या तथ्यानुसार, असे सांगण्यात आले की, सतत उपवास केल्यामुळे रुग्णांच्या संख्येत 70 टक्के वाढ होते. रुग्णांची अचानक संख्या वाढण्यामागे खाण्या-पिण्याच्या पद्धती आणि वेळा ही प्रमुख कारणे आहेत. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेले लोकही उपवास करतात. आरोग्यासाठी हितकारक वेळापत्रकानुसार अन्न सेवन न केल्यामुळे असे लोक आजारी पडण्याचा धोका जास्त असतो.
माहितीअभावी समस्या वाढतात - डॉक्टरांच्या मते, आहारासंबंधी योग्य माहिती नसल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात. उपवास करणारे लोक गरजेपेक्षा जास्त खाण्यामुळे, छोट्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, तसेच गरजेपेक्षा जास्त थंड दूध ,ज्यूस किंवा सरबत प्यायल्याने आजारी पडतात. रात्री उशिरापर्यंत जागरण हेदेखील आजारांमागील मुख्य कारण आहे.