आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवरून शार्क देणार सतर्कतेचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम ऑस्ट्रेलियात समुद्रातील काही शार्क मासे किनार्‍याच्या खूप जवळ येतात. आता तर पोहणार्‍ या लोकांनी जवळ येऊ नये, याची सूचना खुद्द शार्कतर्फेच ट्विटरवर दिली जात आहे. हे वाचून सगळ्यांनाच नवल वाटेल. कारण शार्क ट्विटरचा वापर कसा करेल, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एका प्रकल्पाअंतर्गत अशा प्रकारचे सूचना तंत्र विकसित करण्यात आले आहे.


शास्त्रज्ञांनी येथील प्रसिद्ध ग्रेट व्हाइट शार्कसह 320 हून अधिक शार्क माशांमध्ये ट्रान्समिटर लावले. त्यामुळे शार्क मासे किनार्‍याजवळ वर किंवा खाली आल्यास कंट्रोल रूम, जलतरणपटू आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना एक ट्विट मिळेल. ही लिंक फेसबुकलाही जोडण्यात येणार आहे. ट्रान्समिटरद्वारे ठरावीक शार्क मासा कोणत्या किनार्‍याजवळील एक किलोमीटर परिसरात आहे, याची माहिती दिली जाईल. त्यातून मिळणारे ट्विट ‘सर्फ लाइफ सेव्हिंग वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’च्या खात्यावर पोहोचेल. त्याद्वारे इतर ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली जाईल. एवढेच नाही, तर संबंधित शार्क किती मोठा आहे आणि तो सध्या कुठे आहे, याची माहिती ट्विटरवरून मिळेल. रेडिओ आणि वर्तमानपत्रासारख्या पारंपरिक माध्यमांपेक्षा हे माध्यम जास्त वेगवान आहे. त्यामुळे आता सर्फर किंवा इतर कुणीही, आम्हाला इशारा देण्यात आला नाही, असे म्हणू शकणार नाही. स्थानिक प्रशासन समुद्र किनार्‍ यावर हेलिकॉप्टर आणि बोटींद्वारे शार्कवर निगराणी केली. मात्र, ही पद्धत खूप महाग आणि कमी प्रभावी ठरत होती. शार्कमध्ये लावलेल्या ट्रान्समिटरची बॅटरी 10 वर्षांपर्यंत चालेल. तसेच ती बंद होणे किंवा खराब होण्याची शक्यताच नाही.


पश्चिम ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनार्‍यावरील शार्क मासे हल्ले करण्यासाठी खूप आक्रमक समजले जातात. नोव्हेंबर महिन्यात तेथे 35 वर्षीय सर्फर क्रिस बॉइड यावर शार्कने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला.