आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंढपाळाने घालवली एकांतवासात 46 वर्षे!, अर्जेंटिना परिसरात राहणारा अवलिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- 21 वे शतक माहिती-तंत्रज्ञानाचे किंवा आधुनिक असले तरी एक व्यक्ती 46 वर्षांपासून एकांतवासात राहते. विश्वास बसणार नाही, परंतु हे वास्तव आहे. ती दुर्गम भागात राहत असून तिला केवळ रेडिओची सोबत आहे.
फॉस्टिनो बॅरिएंटॉस असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे वय 81 वर्षांचे आहे. दक्षिण स्वात हा प्रदेश चिली व अर्जेंटिनाच्या जवळ येतो. ते राहत असलेला भाग भौगोलिक पातळीवर जगाचा एक कोपरा आहे. गुरे राखण्याचे काम करणाºया फॉस्टिनो यांची अर्धी हयात एकांतवासात गेली. त्यांच्या सोबतीला आहेत मेंढ्या व एक रेडिओ. 1965 पासून त्यांचा ही एकांतवासाची साधना चालली आहे.
एवढी वर्षे एकांतात राहूनही त्यांना याचा अजिबात कंटाळा आलेला नाही. या भागात आपण आयुष्याच्या अखेरपर्यंत राहणार आहोत, असे फॉस्टिनो म्हणतात. ओहिगिन्स तलावाभोवतीच लहानाचे मोठे झाल्याची आठवण ते सांगतात. मात्र, 11 भावंडांनी त्यांना सोडल्यानंतर त्यांनी अर्जेंटिनाला जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवस त्यांनी बांधकामाच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली होती, परंतु त्यात काही त्यांचे मन रमले नाही. अखेर ते चिलीच्या पाटागोनिया भागातील रानावनात परतले, असे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे.
आहिगिन्स तळे पाटागोनियातील अतिशय दुर्गम भागात येते. गुरे राखण्याचे काम करण्यासाठी फॉस्टिनो यांनी या भागात दोन छोट्या झोपड्या बांधल्या आहेत. एका झोपडीत झोपणे, खाणे, रेडिओ ऐकणे अशी कामे करण्यात येतात. दुसºया झोपडीत टेहळणीची व्यवस्था, चरबीचे टब, त्याचबरोबर इतर बोटिंगचे साहित्य साठवण्यात आले आहे. एका कॅलेंडरवर ते दिवसाची खूण करतात.
रेडिओवरून मी वेगवेगळ्या देशांतील राजकारणाची माहिती घेतो. राजकारण स्वत:च स्वत:ला शिकवतो, असे ते सांगतात. दोन वर्षांपूर्वी सरकारला त्यांच्या अस्तित्वाची माहिती मिळाली. तेव्हा त्यांच्याकडे एक बंदूक असल्याचे कळाले. त्यामुळे सरकारचे काही अधिकारी त्यांच्याकडे आले. त्यांनी बंदूक मागितली. त्यावर फॉस्टिनो यांनी बंदुकीच्या बदल्यात सरकारकडून एक सौर यंत्र घेतले. हे यंत्र मिळाल्यानंतरही त्यांनी याचा फार वापर केला नाही. लोकांपासून दूर राहण्यातला आनंद औरच असतो, असे मानणाºया फॉस्टिनो यांचे अलीकडचे आयुष्य मात्र आधुनिकतेमुळे अधिकच डोईजड झाले आहे.
एकदाच टीव्ही पाहिला - फॉस्टिनो यांनी आयुष्यात एकदाच टीव्ही पाहिला आहे. काही आधुनिक गोष्टींमध्ये त्यांना रस आहे. राजकारणाची माहिती ते ठेवतात. रेडिओवरून खेळाची ताजी माहिती ठेवण्यात मात्र त्यांना रस आहे.