आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sheldon Adelson, Warren Buffett Agree On At Least One Thing

दोन वेळा भांडवल गमावून बसलेल्या या अमेरिकनचे दररोजचे उत्पन्न होते 254 कोटी रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेल्डन एडेलसन : अमेरिकेत इमिग्रेशन प्रणाली विकसित करण्याच्या अभियानात कार्यरत असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट यांना आणखी एका अब्जाधिशाची मदत मिळाली आहे. ते आहेत शेल्डन एडेलसन . जगभरात ते ‘कॅसिनो मॅग्नेट’म्हणून प्रसिद्ध आहेत.

254 कोटी रुपये 2013 मध्ये रोजची कमाई होती
10 व्या क्रमांकावर अब्जाधीशांच्या यादीत
9 कॅसिनो आणि हॉटेल अमेरिका, मकाऊ, सिंगापूरमध्ये आहेत.

टॅक्सीचालक वडील आणि शिवणकाम करणार्‍या आईच्या घरी 4 ऑगस्ट 1933 रोजी जन्मलेले एडेलसन यांचे बालपण खूप हलाखीत गेले. ते अनेक वर्षे दोन भाऊ आणि बहिणीसोबत एका खोलीत राहिले. सायकल चालवायला आवडत होती, मात्र ती घेण्याची ऐपत कुटुंबाची नव्हती. वडील इच्छा पूर्ण करू शकत नव्हते. तीन वर्षे पंक्चरचे काम करून 35 डॉलर कमावले. 12 व्या वर्षी समज आल्यानंतर काकांकडून 200 डॉलर उसने घेऊन वृत्तपत्राची एजन्सी सुरू केली. यातून बर्‍यापैकी कमाई होत राहिली.

1950 मध्ये कॉर्पोरेट फायनान्स आणि रिअल इस्टेटचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, मन न रमल्यामुळे वर्षभरातच त्यांनी कॉलेज सोडले. यानंतर कोर्ट रिपोर्टर झाले व नंतर लष्करात भरती झाले. दहा वर्षे लष्करात काढल्यानंतर 1960 मध्ये वॉल स्ट्रीटमध्ये गुंतवणूक सल्लागार होऊन कोट्यवधी रुपये कमावले. अनेक वर्षांच्या कमाईनंतर ते बोस्टनमध्ये आले. अनेक कंपन्यांमध्ये पैसा गुंतवून ते 70 कंपन्यांचे मालक झाले.

1968 पर्यंत म्हणजे वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत त्यांनी पाच दशलक्ष डॉलर कमाई केली होती. याच वर्षी शेअर बाजार गडगडल्याने सर्व भांडवल गमावून ते कर्जात बुडाले. स्वत:ला सावरत नंतर त्यांनी रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवण्यास सुरुवात केली. बाजार पुन्हा पडला आणि ते पुन्हा रस्त्यावर आले.

1970 मध्ये ते कायमस्वरूपी व्यवसायाच्या शोधात होते. उसनवारी करून मासिक प्रकाशित करणारी कंपनी खरेदी केली. एके दिवशी रिअल इस्टेटच्या ट्रेड शोमध्ये कॉम्प्युटर ट्रेड शो करण्याची कल्पना त्यांना सुचली. 1973 मध्ये त्यांनी जगातील पहिल्या कॉम्प्युटर ट्रेड शोचे आयोजन केले. यानंतर अशाच कामात त्यांनी अडीच लाख डॉलरची कमाई केली.

पुढील स्लाइडमध्ये, कसे झाले अब्जाधीश