आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरातील श्रीमंत राष्ट्रे भारताच्या शर्तींसमोर झुकली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाली- जागतिक व्यापार संघटनेच्या शिखर परिषदेत अखेर श्रीमंत राष्ट्रांना आपल्या अटी-शर्तींसमोर झुकवण्यास भारताने भाग पाडले. भारतातील गोरगरिब जनतेसाठी राबवण्यात येणारी अन्न सुरक्षा योजना आणि शेतकर्‍यांना मिळणारी आधारभूत किंमत रद्द करण्याचा आग्रह अमेरिकेसह र्शीमंत राष्ट्रांनी धरला होता.परंतु या सर्व योजना कायम ठेवून शनिवारी शिखर परिषदेत 159 देशांमध्ये ऐतिहासिक व्यापार करार झाला. या करारामुळे जागतिक व्यापार सुमारे 1 खर्व डॉलर्स (सुमारे 64 हजार 400 अब्ज रुपये) वाढणार आहे.
दोहा येथील बोलणी अपयशी ठरल्यानंतर बाली येथील शिखर परिषदेकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते.शनिवारी सकाळी 159 देशांच्या वाणिज्य-व्यापार मंत्र्यांनी ऐतिहासिक करारावर स्वाक्षर्‍या केल्या. यजमान इंडोनेशियाच्या व्यापार मंत्री गिता विर्जवान यांनी कराराचे वर्णन ऐतिहासिक यश असे केले. भारतातर्फे वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कमालीच्या संयमाने व मुत्सुद्देगिरी दबाव झुगारून आपल्या अटी-शर्ती र्शीमंत राष्ट्रांच्या गळी उतरवल्या.
भारताने रोखला करार
भारत, चीनसह 33 विकसनशील राष्ट्रांनी गोरगरिबांना अन्न व शेतमालाची सबसिडी बंद करण्यास ठाम नकार दिला होता. अन्न सुरक्षा योजना आणि शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान, आधारभूत किंमत आदी मुद्दय़ांवर भारताने ठामपणे आपली बाजू मांडली.कोणत्याही परिस्थितीत या योजना बंद के ल्या जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.
करारातील मुख्य अटी
>व्यापार सुलभ होण्यासाठी सर्वच देशांनी अबकारी शुल्काची प्रक्रिया सोपी करावी
>अबकारी शुल्काचे कायदे पारदर्शक करावेत

फायदा : जगभरातील व्यापारात सुमारे 64 हजार 400 रुपयांची उलाढाल वाढण्यास मदत.
भारतासाठी ऐतिहासिक करार
बाली करार भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक करार ठरला. दोहा परिषदेतील अडथळ्यांवर मात करुन करारास नवसंजीवनी देण्यात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली.’’ आनंद शर्मा, वाणिज्य मंत्री