आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाज दुर्घटनेतील भारतीय सुरक्षित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम - इटलीच्या समुद्रकिनारी झालेल्या जहाज दुर्घटनेतील अडकलेल्या 300 भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. इटलीतील भारतीय राजदूत देबब्रत सेन यांनी सोमवारी ही माहिती दिली.
दुर्घटनाग्रस्त कोस्टा कॉनकॉर्डिया जहाजातून 4 हजाराहून अधिक लोक प्रवास करत होते. शुक्रवारी रात्री ही जहाज समुद्र तळाशी असलेल्या खडकावर आदळली होती. आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय राजदूतांनी सांगितले. 15 लोक बेपत्ता आहेत, परंतु सर्व भारतीय नागरिक हे सुरक्षित आहेत. भारतीय नागरिकांना आम्ही वेळोवेळी सर्व ती मदत पुरवत आहोत. ज्या गोष्टीची गरज भासेल तेव्हा त्याची गोष्टीची मदत करण्यात येईल. प्रवासाशी संबंधित सर्व दस्तऐवज पुरवण्यात येतील, असे भारतीय राजदूत कार्यालयातील कौन्सेलर सुनील अग्रवाल यांनी सांगितले.