आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shoe Thrown At Parvez Musharraf In Sindh High Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परवेझ मुशर्रफ यांना न्‍यायालयाच्‍या आवारात मिळाला बूटाचा \'प्रसाद\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्‍यावर आज बुट फेकण्‍याचा प्रकार घडला. सिंध उच्‍च न्‍यायालयात त्‍यांची अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ मिळण्‍यासाठी सुनावणी होती. त्‍यासाठी ते न्‍यायालयात आले असताना हा प्रकार घडला. दरम्‍यान, अटकपूर्व जामीनाची मुदत 15 दिवसांनी वाढविली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मोठा दिलासा दिला आहे.

मुशर्रफ यांनी जामीनास मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्‍यासाठी ते स्‍वतः न्‍यायालयात हजर होते. सुनावणी झाल्‍यानंतर बाहेर पडताना त्‍यांच्‍यावर बुटफेकीचा प्रकार घडला. सुनावणीदरम्‍यान न्‍यायालयाबाहेर आधीपासूनच मुशर्रफ यांच्‍याविरोधात तीव्र निदर्शने करण्‍यात येत होती.