आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूयॉर्क - अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधील गुरुद्वारामध्ये रविवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात एका हल्लेखोरासह सुमारे 8 जण मारले गेल्याचे वृत्त आहे. या घटनेत सुमारे 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
दोन ते तीन हल्लेखोरांनी गुरुद्वारामध्ये बेछूट गोळीबार चालवला असून, त्यांनी सुमारे 12 मुलांसह 150 लोकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता ओक क्रीक शहरात ही घटना घडल्याचे अमेरिकेतील भारताच्या राजदूत निरुपमा राव यांनी म्हटले आहे. घटना कळताच पोलिसांनी गुरुद्वाराभोवती बंदोबस्त कडक केला. हल्लेखोर श्वेतवर्णीय आणि बलदंड शरीरयष्टीचा होता. त्याच्या अंगात बिनबाहय़ाचे टी-शर्ट होते. डोक्यावर केस नव्हते. तसेच त्याच्याजवळ दोन हँडगन होत्या, असे एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले. गुरुद्वारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोरासह चार जण बाहेर मारले गेले. मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आतमध्ये आणखी हल्लेखोर आहेत किंवा काय याबाबत पोलिसांना माहिती मिळाली नसल्याचे ग्रीनफील्डचे पोलिस प्रमुख ब्रॅडले वेंटलँड यांनी सांगितले. दरम्यान, भारतातून शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे पथक अमेरिकेकडे रवाना झाले आहे.
ओबामांनी माहिती घेतली : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुद्वारामधील हल्ल्याविषयी माहिती घेतली. दहशतवादविरोधी मोहिमेचे सल्लागार जॉन ब्रेनन यांनी त्यांना परिस्थितीचा तपशील सांगितला. व्हाइट हाऊस या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे.
रविवारमुळे गर्दी, शेकडो लोक गुरुद्वारात - न्यूयॉर्कपासून 1250 कि.मी. अंतरावरील ओक क्रीकच्या या गुरुद्वारामध्ये रविवार असल्याने सुमारे 300 ते 400 लोक आलेले होते. भारतातून आलेल्या एका संताचे या ठिकाणी प्रवचन होते, असे सतवंत यांची मेहुणी परमिंदर कौर यांनी सांगितले. जवळपास 25 लोक जखमी झाल्याचेही त्या म्हणाल्या.
परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा
परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा यांनी या घटनेबाबत राजदूत निरुपमा राव यांच्याशी चर्चा केली. आपण व्हाइट हाऊसच्या कायम संपर्कात असल्याचे राव यांनी त्यांना सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी या घटनेचा निषेध केला.
आसाममध्ये शरणार्थी शिबीरातही गोळीबार
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.