आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Short Skirts And High Heels North Korean Women Fashion Secrets

शॉर्ट स्कर्ट आणि हाय हील शूज, हे आहे नॉर्थ कोरियन महिलांचे ब्युटी सिक्रेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योंगयांग - उत्तर कोरिया या देशाची चर्चा नेहमीच एक गूढ आणि हुकूमशहा यासाठी झाली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी असलेल्या फॅशनचा विषयही चर्चेत आहे. या देशातील फॅशन ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. शॉर्ट स्कर्ट आणि हाय हील्स शूज याला येथील तरुणींची पहिली पसंती असल्याचे चित्र आहे. येथे जीन्स परिधान केलेली तरुणी विरळच आढळते, त्याचे कारण म्हणजे जीन्स सध्या आऊट ऑफ फॅशन मानली जाते.
फोटो - पर्यटकांनी पोस्ट केलेले उत्तर कोरियन महिलेचे छायाचित्र.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची पत्नी री सोल जू या येथील महिलांसाठी स्टाइल आयकॉन बनल्या आहेत. सामान्यपणे किम यांच्याबरोबर त्या स्मार्ट स्कर्ट सूट्स परिधान केलेल्या आढळतात. त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलला देशात चांगली पसंती मिळत आहे. उत्तर कोरियाचे अनेक टूर केलेल्या कोर्यो टूर्सच्या क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मॅनेजर विकी मोहिइडेन म्हणतात की, सोल जू यांची स्टाइल फार वेगळी नाही पण त्यांच्या सुंदर हँडबॅग, ब्राऊचेस आणि महागडे सामान नागरिकांना आकर्षित करतात. त्यांचे व्यक्तिमत्त्वही लोकांवर चांगलाच प्रभाव पाडते. त्यांच्याबरोबरच चीनची सीमा असल्याने तेथील फॅशनचाही येथील राहणीमानावर प्रभाव दिसून येतो.
त्याचबरोबर महिलांच्या फॅशनमध्ये आलेल्या बदलासाठी मोरानवाँग बँड मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचेही अनेकांचे मत आहे. फीमेल पॉप सिंगर असणारा हा ग्रुप 2012 मध्ये लोकांसमोर आला होता. या बँढच्या सर्व 18 महिला सदस्यांचे केस कमी आहेत, आणि त्या शॉर्ट स्कर्टबरोबर हाय हील्स वापरतात. त्याला अनेकजण फॉलो करतात. मोहिइडेन यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान येथील महिलांची फॅशन कॅमेऱ्यात कैद केली. त्यांचे फोटोंचे हे कलेक्शन त्यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टही केले.
पुढे पाहा, उत्तर कोरियामध्ये फॅशनचा नवा ट्रेंड दाखवणारे PHOTO