आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Show Polution Dengerous Through Models, Divya Marathi

Incredible: छोट्या प्रतिकृतीतून दाखवले वाढत्या प्रदूषणाचे धोके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात स्वच्छता राखण्याची खबरदारी घेणा-या शहरांची संख्या खूप कमी आहे. बहुतांश शहरांची अवस्था दयनीय आहे. ती दाखवण्यासाठी टोकियोतील कलावंत सातोशी अराकीने वेगळाच मार्ग निवडला. त्याने स्टेरोफोम बोर्डपासून प्रदूषण आणि क्षयरोग पसरवणा-या काही घटनांच्या प्रतिकृती तयार केल्या. गुगल इमेजच्या मदतीने त्यांनी या प्रतिकृती बनवल्या आहेत. सातोशी यांनी या प्रतिकृतीत ट्रेचिंग ग्राउंड, ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या, धूळ खात पडलेली वाहने, ओसाड इमारती आणि बगदादमध्ये बॉम्बस्फोट झालेली जागा दाखवली आहे.
जर माणूस अशा वातावरणात आपले जीवन जगत असेल तर काही वर्षांनंतर त्याला जगणे अशक्य होईल. वातावरणातील वाढते प्रदूषण मानवी जीवनासाठी धोकादायक ठरत आहे. याचे नियोजन योग्य प्रकारे न केल्यास पुढच्या पिढीला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

spoon-tamago.com