आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shrien Dewani And Anni Dewani Honeymoon Murder Case

PICS : हनीमूनच्‍यावेळी या महिलेची झाली हत्‍या, मुंबईमध्‍ये झाले होते लग्‍न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लॅटिन अमेरिकेतील केपटाऊनमध्‍ये हनीमूनच्‍या वेळी भाडोत्री गुंडांना सूपारी देऊन पत्‍नीची हत्‍या केल्‍याचा आरोप असलेल्‍या श्रीयन देवानीची न्‍यायालयाने निर्दोश मुक्तता केली आहे.
या बाबात सविस्‍तर वृत्त असे की, चार वर्षांपूर्वी हनीमूनसाठी पत्‍नी अन्‍नी देवानीसोबत केपटाऊनला गेलेल्‍या श्रीयनने भाडोत्री गुंडाना सूपारी देऊन पत्‍नीची हत्‍या केल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला होता. अन्‍नीची नोव्‍हेंबर 2010 मध्‍ये गोळी घालून हत्‍या करण्‍यात आली होती. एका बेवारस टॅक्‍सीमध्‍ये अन्नीचा मृतदेह सापडल्‍यांनतर हे प्रकरण उघडकीस आले होते.
मुंबईमध्‍ये झाले लग्‍न -
अन्‍नी आणि श्रीयन देवानीचे 29 नोव्‍हेंबर 2010 मध्‍ये लग्‍न झाले. हनीमूनसाठी केपटाऊनला गेल्‍यांनतर टॅक्‍सीमध्‍ये प्रवास करत असताना अपहरण करण्‍यात आले होते. दुस-या दिवसी एका बेवारस टॅक्‍सीमध्‍ये अन्‍नीचा मृत्‍यदेह सापडला होता.
काय आहे प्रकरण-
नवविवाहीत जोडपे देवानी 2010 मध्‍ये अफ्रिकेत हनीमूनसाठी गेले होते. यावेळी देवानीची पत्‍नी अन्‍नीची हत्‍या करण्‍यात आली. टॅक्‍सी ड्रायव्‍हरच्‍या मदतीने देवानीनेच पत्‍नीची हत्‍या केली, असा आरोप झाला होता. पिस्‍टोरियस प्रकरणानंतर सर्वात मोठे दुसरे हात्‍या प्रकरण म्‍हणून याला ओळखले जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा अन्‍नी आणि श्रीयनच्‍या लग्‍नाची फोटो...