आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘युरोपा’वर मिळाले जीवसृष्टीचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात आधी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, आपल्याला माहीत नाही, गुरू ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्रापैकी एक ‘युरोपा’ उपग्रहावर मासे आहेत. परंतु आपल्याला हेही माहिती नाही की, येथे मासे नाहीतच. आपल्याकडे फक्त इतकीच माहिती आहे की, येथे भरपूर पाणी आहे. इतके की, संपूर्ण ब्रह्मांडाला चारही बाजूने व्यापू शकेल. हे शंभर मैल खोल समुद्रासारखे आहे. जो जवळपास दहा मैल जाड बर्फाच्या तुकड्याने झाकलेला आहे. पृथ्वीच्या अथांग सागरांप्रमाणे ‘युरोपा’वरील हे पाणी जीवसृष्टीसाठी अनुकूल नाही. कारण यात मीठ आणि कार्बनी संयुग (ऑर्गेनिक कंपाउंड) नाहीत. या बाबीही तेथे अस्तित्वात आहेत आणि आता येथे जीवसृष्टीची शक्यताही असू शकते हे हवाईमध्ये ‘केक टू टेलिस्कोप’द्वारे केलेल्या नवीन सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘युरोपा’वर जलसृष्टी असण्याचे कारण गुरू ग्रहावर उपस्थित इतर चंद्र आहेत, जे त्याच्याजवळून जाताना त्याला आपल्याकडे खेचतात. यामुळे ‘युरोपा’चा आतील भाग पसरट होत उष्ण होतो. हेच कारण आहे की, बर्फ वितळत राहतो. हेच ध्यानात घेत काल्टेकचे ग्रहीय शास्त्रज्ञ माइक ब्राउनने केकच्या परिणामांच्या मदतीने ‘युरोपा’च्या आत आणि त्याच्या वातावरणात सोडियमच्या उपस्थितीचे अध्ययन केले.


‘युरोपा’च्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम सल्फेट तर आहेच. येथे सोडियम क्लोराइडही असण्याची शक्यता असल्याचे त्यांना माहीत पडले. बर्फाला पडलेल्या तड्यांवरून अंदाज लावता येतो की, पृष्ठभागाच्या आतून वस्तू बाहेर येतात आणि वरील वस्तू आत जातात. हे महत्त्वाचे आहे. कारण ‘युरोपा’ला आतापर्यंत अनेक धूमकेतू धडकलेत. ते जैविक कार्बनी संयुगाचे वाहक असतात. म्हणजेच युरोपावर मीठ आहे, जैविक तत्त्वे आहेत. उष्णता आहे आणि पाणीही. माइक ब्राउन म्हणतात, हे सारे जीवसृष्टी असण्याचे संकेत आहेत.


गुरूपेक्षाही खूप छोटी आहे पृथ्वी
युरोपा आणि पृथ्वीच्या चंद्राचा आकार बहुतांशी सारखाच आहे, परंतु गुरूच्या तुलनेत पृथ्वी अत्यंत छोटी आहे.
140000 किमी गुरूचा व्यास
670000 किमी गुरूपासून युरोपाचे अंतर
3140 किमी युरोपाचा व्यास
12743 किमी पृथ्वीचा व्यास
385000 किमी पृथ्वी ते चंद्राचे अंतर
3476 किमी चंद्राचा व्यास


ज्वालामुखीच्या स्फोटाने वाढले तपमान
एका गोलार्धावर सल्फरचे कण मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जे जवळच असलेल्या चंद्रावर असलेल्या ज्वालामुखीतून उडून येतात. या ज्वालामुखीत होणा-या स्फोटांचे कारणही तेच आहेत, जे युरोपाला उष्ण करतात.
बर्फाचे तुकडे युरोपाचा पृष्ठभाग पूर्णत: बर्फाने झाकलेला आहे आणि याचे तपमान -134 डिग्री सेल्सियसच्या जवळपास आहे. पसरल्यामुळे यात उष्णता निर्माण होते आणि याचमुळे यात तडे गेले आहेत आणि त्या पृष्ठभागावरही दिसून येतात.
आतील उष्णता युरोपा जेव्हा आपल्याच कक्षेत फेरफटका मारतो तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे दुसरे चंद्र याला स्वत:कडे खेचतात. याचे प्रसरण होते आणि अंतर्गत भागात उष्णता वाढते. याला ‘टाइडल हिटिंग’ नावाने ओळखले जाते.
अथांग सागर युरोपा एका तथाकथित वैश्विक सागराने झाकलेला आहे. हा जवळपास शंभर मैल खोल असू शकतो.
गिजर्स आत उपलब्ध पाणी अनेकदा बर्फातील तड्यांतून वर येते. या तड्यांमधून पृष्ठभागावर उपलब्ध वस्तूही खाली येतात.