आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sikh Couple Forced To Leave Movie Theater For Wearing Kripan

\'कृपाण\' धारण केल्‍यामुळे अमेरिकेत शीख जोडप्‍याला चित्रपटगृहातून काढले बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत एका शीख जोडप्‍याला वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. 'कृपाण' धारण केल्‍यावरुन या जोडप्‍याला चित्रपटगृहातून बाहेर काढण्‍यात आले. या घटनेनंतर त्‍यांनी चित्रपटगृहाच्‍या व्‍यवस्‍थापनाने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. संबंधित चित्रपटगृह 'एएमसी थिएटर्स' या कंपनीच्‍या माल‍कीचे आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, ही घटना 22 जून रोजी घडली होती. मनज्‍योतसिंग हे पत्नीसह कॅलिफोर्निया येथील एएमसी सिनेमा येथे 'मॅन ऑफ स्‍टील' हा चित्रपट पाण्‍यासाठी गेले होते. परंतु, त्‍यांना चित्रपटगृहातून बाहेर काढण्‍यात आले. तसेच लॉबीमध्‍ये त्‍यांना 10 मिनिटे थांबवून अपमानास्‍पद वागणूक देण्‍यात आली, असे मनज्‍योतसिंग यांचे म्‍हणणे आहे. मनज्‍योतसिंग यांनी कंपनीविरुद्ध खटला चालविण्‍याची तयारी केली आहे.

मनज्‍योतसिंग हे कृपाण धारण करुन होते. शीख समुदायातील नागरिक कृपाण हे शस्‍त्र धारण करतात. मात्र, मनज्‍योतसिंग यांनी शस्‍त्राचे कोणत्‍याही प्रकारे जाहीर प्रदर्शन केले नाही किंवा त्‍याचा धाक दाखविण्‍याचाही प्रयत्‍न केला नाही, असा दावा 'युनायटेड शीख' या संघटनेने केला आहे. चित्रपटगृहातील सीसीटीव्‍ही फुटेज सांभाळून ठेवावे आणि ते तपासून पाहावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.