आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sikh Group Launches White House Online Petition Against Modi

मोदींना अमेरिकेत बोलावू नका, शिख संघटनेची ऑनलाईन मोहिमेद्वारे ओबामांना विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेची एका मानवाधिकार संघटना 'सिख फॉर जस्टीस' (SFJ) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ऑनलाईन मोहिम सुरू केली आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीचा संदर्भ देत अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी मोदी यांना पाठवलेले आमंत्रण रद्द करावे अशी मागणी या संघटनेने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तेथे मोदी संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत भाषण करणार आहेत. त्यानंतर ते वाशिंग्टन डीसीला रवाना होतील.
सोनिया, मनमोहन सिंग यांच्या विरोधातही मोहिम
SFJ ने 1984 च्या शिख विरोधी दंगलीसंदर्भात सोनिया गांधी आणि तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधातही अशी मोहिम सुरू केली होती. SFJ तर्फे सोमवारी सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन मोहिमेव्दारे करण्यात आलेल्या याचिकेत "राष्ट्रपती बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये मोदींच्या पाहूणचाराऐवजी विरोध करायला हवा. तसेच मुस्लीम, शिख आणि ख्रिस्ती बांधवांवर झालेल्या हिंसाचारासंदर्भात भाजपावर बंदी घालायला हवी" असे म्हटले आहे.
याचिकेबद्दल निरुत्साह
जुन 1984 मध्ये झालेल्या सुवर्ण मंदिरातील सैन्य हल्ल्यात भाजपची महत्त्वाची भूमिका होती, या हल्ल्यात हजारो शिख बांधवांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर 2008 मध्ये भाजपने ओडिसातील ख्रिस्त बांधवांविरोधात हिंसाचाराचा कट रचला होता, असे आरोप या याचिकेतून लावण्यात आले आहेत. या याचिकेवर 20 ऑगस्टपर्यंत कमीत कमी 1 लाख स्वाक्षर्‍या व्हायला हव्यात. तेव्हाच कुठे व्हाईट हाऊस या याचिकेवर विचार करू शकेल. मात्र याचिकेच्या पहिल्या दिवशी यावर केवळ २५ पेक्षाही कमी जणांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
फाइल फोटो: पंतप्रधान नरेंद्र मोदी