आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Silicon Valley Billionaire Buys Record Life Policy News In Marathi

सिलिकॉन व्हॅलीतील श्रीमंत अब्जाधीशाचा 1200 कोटींचा विमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिलिकॉन व्हॅलीतील एका अब्जाधीशाने आपला चक्क 1200 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. जगातील ही सर्वांत मोठी विमा पॉलिसी ठरली आहे. या व्यक्तीचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.

यापूर्वी मोठय़ा पॉलिसीचा विक्रम हॉलीवूडचा बादशहा डेव्हिड ग्रिफनच्या नावे होता. त्याने 1990 मध्ये 100 दशलक्ष डॉलरचा (आजच्या हिशेबाने सुमारे 650 कोटी रुपये) विमा उतरवला होता. त्याचे नाव गिनीज बुकातही नोंदले गेले. हा विक्रम आता मोडीत निघाला आहे. गिनीजने 1200 कोटींची पॉलिसी काढणार्‍या ‘एसजी’ कंपनीचे संस्थापक डॉव्ही फ्रान्सेस यांना नव्या विक्रमाचे र्शेय दिले आहे. ग्रिफन यांची पॉलिसी काढणारे युनायडेट किंगडम लाइफ इन्श्युरन्स कंपनीचे सेल्समन पीटर रॉजनगार्ड यांना फ्रान्सेस यांनी मागे टाकले आहे.

अमिताभचा विमा 150 कोटींचा
अमिताभ बच्चन यांनी 1996 मध्ये आपला 150 कोटींचा विमा उतरवला होता. अभिषेकने तो काढला होता. तेव्हा हा देशातील सर्वांत मोठय़ा रकमेचा विमा होता. ही पॉलिसी काढल्याबद्दल अभिषेकला 20 टक्के कमिशनपोटी 30 कोटी रुपये मिळाले होते, हे विशेष.

सात महिन्यांचे कष्ट!
सांता बार्बरा येथील एसजी एलएलसी कंपनीचे अध्यक्ष फ्रान्सेस 2010पासून या अब्जाधीशाच्यामागे होते. 7 महिन्यांच्या अथक पर्शिमांनंतर हा विमा प्रत्यक्षात उतरल्याचे ते सांगतात. कोणी एक कंपनी तयार नव्हती. त्यामुळे 19 कंपन्यांनी एकत्रित हा विमा उतरवला. वारसदार ऐतखाऊ होऊ नयेत म्हणून या अब्जाधिशाला विम्याची माहिती वारसांपासून गुप्त ठेवायची आहे.