आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Silvio Berlusconi Finalises Divorce From Veronica Lario, Leaving Him Free To Marry Girlfriend 50 Years His Junior

इटलीचे माजी पंतप्रधान 77 व्या वर्षी करणार 28 वर्षीय देखण्या युवतीशी विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम- इटलीचे माजी पंतप्रझान सिल्वियो बर्लुस्कोनी यांनी पत्नी वेरोनिका लारियो यांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर बर्लुस्कोनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या एका देखण्या तरुणीसोबत विवाह करणार आहेत. फ्रांसेस्का पास्कल असे या युवतीचे नाव असून, बर्लुस्कोनींची ती तिसरी पत्नी असेल. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, फ्रांसेस्काने लग्नाची पूर्ण तयारी केली आहे. एवढेच नव्हे तर लग्नासाठीचा ड्रेसही खरेदी केला आहे.
लारियो बर्लुस्कोनी यांची दुसरी पत्नी आहे. लारियो यांनी गेली 24 वर्ष बर्लुस्कोनी यांच्यासमवेत व्यतीत केली. याबाबत सांगितले जात आहे, की लारियो-बर्लुस्कोनी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरु आहे. हे दोघे 2009 पासून वेगळे राहत आहेत मात्र आता या दोघांनी कायदेशीरित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाने बर्लुस्कोनीना त्यांच्या मुलांना प्रत्येक महिन्याला 30 लाख युरो देण्याचा आदेश दिला होता. मात्र रक्कम जास्त असल्याबाबत अपील केल्यानंतर ही रक्कम 30 वरून 16 लाख युरोवर आली आहे.
28 वर्षीय फ्रांसेस्कासोबत तिसरे लग्न केल्यानंतर 77 वर्षीय बर्लुस्कोनी रोममधील एका आलीशान अपार्टमेंटमध्ये वैवाहिक आयुष्य एन्जॉय करतील. त्यामुळे येत्या काही दिवसांत बर्लुस्कोनी यांच्या आयुष्यात आनंदी आनंद राहणार असल्याचे दिसून येते. मात्र, बर्लुस्कोनी यांच्यावर तीन केसेस सुरू आहेत. यामुळे त्यांच्या आनंदावर गदा येण्याचीही शक्यता आहे.
पुढे वाचा, लारियो आणि फ्रांसेस्का पास्कल यांचे काय म्हणणे आहे बर्लुस्कोनी यांच्याबाबत...