आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Silvio Berlusconi Handed Seven Years Imprisonment For Having Sex With Minor Dancer

बुंगा-बुंगा सेक्‍स पार्टी करणा-या बर्लुस्‍कोनींना 7 वर्षांचा तुरुंगवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- बुगा-बुंगा सेक्‍स पार्टीसाठी कुप्रसिद्ध झालेले इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्‍कोनी यांना एका अल्‍पवयीन डान्‍सरसोबत सेक्‍स करण्‍याच्‍या गुन्‍ह्यात दोषी ठरविण्‍यात आले असून त्‍यांना 7 वर्षांचा तुरुंगावास ठोठाविण्‍यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक पदांवर राहण्‍यासाठी आजीवन बंदीही घालण्‍यात आली आहे.

इटलीच्‍या न्‍यायालयाने हा निर्णय दिला आहे. याप्रकरणावर पडदा टाकण्‍यासाठी राजकीय पदाचा गैरवापर केल्‍याच्‍या आरोपातही बर्लुस्‍कोनींना दोषी ठरविण्‍यात आले आहे. शिक्षेची अमंलबजावणी इतर प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाल्‍यानंतरच होईल. बर्लुस्‍कोनी आणि डान्‍सर करीमा अल महरोग उर्फ रुबी यांनी शारिरीक संबंध असल्‍याचे सातत्‍याने फेटाळले आहे.

बर्लुस्‍कोनी अनेक वर्षांपासून बुंगा-बुंगा सेक्‍स पार्ट्यांसाठी आणि अय्याशीसाठी चर्चेत आहेत. यासंदर्भात त्‍यांच्‍याविरुद्ध अनेक खटले सुरु आहेत.