आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singnature Of Anti Modi Letter A True, American Forensic Institute Report

मोदीविरोधी खासदारांच्या स्वाक्ष-या ख-या, अमेरिकी न्यायवैद्यक संस्थेचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हिसा देऊ नये म्हणून भारतीय खासदारांनी पाठवलेले पत्र ‘कॉपी-पेस्ट’ नसून खरेखुरे असल्याचे अमेरिकी न्यायवैद्यक संस्थेने म्हटले आहे. यावरील स्वाक्ष-याही वेगवेगळ्या लोकांच्या असल्याचे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.


मोदींच्या विरोधात 65 भारतीय खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठवल्याचे प्रसिद्ध होताच अनेक खासदारांनी आपण या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे स्पष्ट केले होते. राज्यसभेतील अपक्ष खासदार मोहम्मद अदीब यांनी 21 जुलैला ओबामा यांना हे पत्र फॅक्स केले होते. यावर राज्यसभेतील 25 व लोकसभेतील 40 खासदारांच्या स्वाक्ष-या होत्या. मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.


स्वातंत्र्यदिनी मोदींना ‘डॉग सॅल्यूट’!
या वर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त भुजमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात डॉग शो आणि डॉग सॅल्यूट प्रमुख आकर्षण असेल. गुजरातच्या इतिहासात प्रथमच अशा समारंभात डॉग शोचे आयोजन केले जात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले राष्टÑीय उत्सव सरकार राजधानीबाहेर साजरे करते.