आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहमतीच्या अभावामुळे कोफी अन्नान पायउतार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलेप्पो - संयुक्त राष्ट्र आणि अरब लीगचे सिरियासाठीचे विशेष संयुक्त दूत कोफी अन्नान यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नान यांच्या या पदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपुष्टात येत असून त्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले.
सिरियाची राजधानी दमास्कस आणि अलेप्पोमध्ये लष्कर आणि बंडखोरांमध्ये तुंबळ लढाई सुरू असताना अन्नान यांनी हे पद सोडले आहे. सिरियामधील वाढते लष्करीकरण आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत त्याबाबत सहमतीचा अभाव यामुळे आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीवर प्रतिकुल परिणाम होत असल्याचे अन्नान यांनी म्हटले आहे.
अन्नान यांनी सिरियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहा सूत्री शांती योजना तयार केली होती. सिरियातील संघर्ष संपुष्टात आणणे हा त्या योजनेचा मुख्य उद्देश होता मात्र सरकार आणि बंडखोर या दोघांनीही तिची अंमलबजावणी केली नसल्यामुळे सिरियात भडकलेला हिंसाचार अजूनही कायम आहे.
सिरियात आघाडी सरकार;अन्नान यांचा प्रस्ताव
अन्नान यांच्या प्रस्तावाला पाठिंब्यास रशिया तयार
सिरिया प्रश्नी अन्नान यांची मध्यस्थी