आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्ताद झाकीर हुसेन यांची बहीण रुही बानो विपन्नावस्थेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - भारतीय तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांची सावत्र बहीण रुही बानो पाकिस्तानमध्ये विपन्नावस्थेत दिवस काढत आहेत. रुही यांच्या एकुलत्या एक मुलाची आठ वर्षांपूर्वी हत्या झाली. याचा त्यांना कमालीचा मानसिक धक्का बसला. मुलाच्या मृत्यूनंतर आलेल्या एकाकीपणात रुही लाहोरच्या कसुरी रस्त्यावरील घरात राहत आहेत.
तबला वादक उस्ताद अल्लारखाँ यांची कन्या रुही बानो यांच्या घरातून दहा लाख रुपयांची चोरी झाल्याच्या वृत्तामुळे त्या चर्चेत आल्या आहेत.

1970 व 1980 च्या दशकात टीव्ही अभिनेत्री राहिलेल्या बानो यांना मानसिक विकार जडला आहे. त्यांच्या घराबाहेर फर्निचरचे अनेक साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले दिसते. स्वयंपाकाचा गॅसही घराबाहेर पडलेला आहे. त्यांच्या घरात टीव्ही ही एकमेव वस्तू चालू स्थितीत असल्याचे एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तात म्हटले आहे. बानो यांना बोलते केल्यानंतर त्यांना शब्द उच्चारण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले. मी दररोज टीव्ही पाहते, एखाद्या दिवशी मी घर स्वच्छ करेन, असे उद्ध्वस्त मानसिकतेतील बानो म्हणाल्या. लाहोर येथील कलावंतांनी बानो यांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने आर्थिक सहकार्य देऊ केले आहे. बानो यांच्या घरी भेट दिल्यानंतर पटकथा लेखक सूरज बाबा यांनीच बानो यांची विपन्नावस्था जगासमोर आणली आहे. सरकारने त्यांना एक मोलकरीण व सुरक्षा रक्षक देण्याची तयारी दर्शवली आहे. पंजाबमधील विधिमंडळ सदस्य कनवाल यांनी बानो यांच्या घराला भेट दिली असून सरकारतर्फे संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.