आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना कार ब्रँडची नावे :ऑडी, फॉर्च्यून, फियाट, पोर्शे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक- थायलंडमध्ये एका जोडप्याने एकाच वेळी जन्मलेल्या सहा मुलांना प्रसिद्ध कार ब्रँडच्या नावे दिली आहेत. दोन महिन्यांपूर्वी या बाळांचा जन्म झाला होता. या जोडप्याने त्यांना आवडणाºया कारची नावे दिली. त्यानुसार मुलांना आॅडी, फॉर्च्यून, पोर्शे, मिनी, वोक्स, फियाट अशी नावे प्राप्त झाली आहेत.
बँकॉक येथील बमरूग्रँड रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी या सहा बाळांचा एकाच वेळी जन्म झाला होता. या बाळांच्या आई-वडिलांनी त्या बाळांना दोन महिने मीडियापासून दूर ठेवले होते. शनिवारी त्यांनी या मुलांना माध्यमांसमोर आणले. त्या वेळी त्यांनी बाळांच्या नावाचा खुलासा केला. सहापैकी तीन मुले असून तीन मुली आहेत. मुलींची नावे आॅडी, मिनी व फॉर्च्यून अशी ठेवण्यात आली असून मुलांना फियाट, वोक्स व पोर्शे अशी ओळख प्राप्त झाली आहे. एखाद्या जोडप्याला एकाच वेळी सहा बाळे होण्याची ही तेथील पहिलीच घटना आहे. यापैकी पाच बाळांचे आरोग्य उत्तम आहे. वजन कमी असल्याने एका बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या बाळांचा जन्म अतिशय कठीण परिस्थितीत झाला होता. कारण त्यांच्या आईच्या गर्भावस्थेत समस्या होती. त्यावर डॉक्टरांनी विट्रो तंत्राद्वारे उपचार केले व ती अडचण दूर केल्यावर सुलभ प्रसूती झाली.
मुलांच्या पित्याने सांगितले ही बालके जन्मापासून कुतूहलाचा विषय बनली आहेत. त्यांचे वेगळेपण जपले जावे म्हणून त्यांना आवडणाºया कार ब्रँडची लोकप्रिय नावे दिली. त्यांच्या देखभालीसाठी इतर तिघांची व्यवस्था करावी लागली आहे.