आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Dead As Gunman Goes On Rampage In California

अमेरिकेत अज्ञात हल्‍लेखोराच्‍या गोळीबारात 6 जणांचा मृत्‍यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टन- अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्‍ये एका अज्ञात व्‍यक्तीने केलेल्‍या गोळीबारात 6 जण ठार झाले. गोळीबारानंतर पोलिसांसोबत झालेल्‍या चकमकीत हा हल्‍लेखोरही ठार झाला. सँटा मोनिका भागात ही घटना घडली. गोळीबारात 5 नागरिक जखमी झाले असून त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. अमेरिकेचे अध्‍यक्ष बराक ओबामा यांचा या परिसरात एक कार्यक्रम होता. कार्यक्रम स्‍थळापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.

सँटा मोनिका विभागातील पोलिस प्रमुख जॅकलीन सिब्रुस यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे वय सुमारे 25 ते 30 वर्षांदरम्यान होते. संपूर्णपणे काळ्या रंगाची वस्‍त्रे हल्‍लेखोराने घातली होती. हल्‍लेखोराच्‍या हातात मोठी बंदूक होती, त्‍याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, असे काही प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. सँटा मोनिका कॉलेज लायब्ररी जवळच्या भागातून या गोळीबाराला सुरूवात झाली. गोळीबारानंतर पोलिसांसोबत उडालेल्‍या चकमकीत हल्‍लेखोर ठार झाला. परंतु, गोळीबारामध्‍ये एकापेक्षा जास्‍त जणांचा सहभाग असल्‍याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.