आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्‍ये चाकू हल्ल्यात सहा जखमी, वर्षातील त‍िसरी घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या गॉंगझाऊ शहरातील व्यस्त रेल्वे स्थानकावर सहा प्रवाशांना अज्ञात चार हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. त्यात ती जखमी झाली आहेत.या चार हल्लेखोरांनी जो त्यांच्या मार्गात येईल त्याची कत्तल केली. एकूण चार मारेकरी होते,त्यांनी सर्वांनी पांढरी टोपी आणि शर्टस परिधान केले होते आणि त्यांच्याकडे लांब चाकू होता, असे प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले.एक मारेकरी मृत्यूमुखी पडला, एकाला अटक आणि फरार झालेल्या दोघांपैकी एकाला नंतर पकडण्‍यात आले, असे गॉंगझाऊ पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक हल्लेखोर जखमी झाला. हल्ल्याची घटना 1 कोटी 40 लाख लोकसंख्‍या असलेल्या महानगरात रेल्वे स्थानकाजवळ घडली. चीन सरकार अशा घटनांना घाबरून न जाता संयमांने सामाजिक स्थैर्य, जीवन आणि संपत्तीच्या संरक्षणाकरिता कटिबध्‍द आहे,असे चीनी परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले.
संशयीतावर एका स्थानिक दवाखान्यात उपचार दिला जात होते.त्याची ओळख पटली आहे. रेल्वेच्या दैनंदिनीवर हल्ल्यांने काही परिणाम झालेला नाही. मात्र प्रवाशांमध्‍ये एक भीती निर्माण झाली आहे. गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर गेल्या 70 दिवसांमध्‍ये तीन वेळेस हल्ले झाले आहेत. यापैकी दोन हल्ले हे झिन्झिएंग येथील अतिरेक्यांनी केले असल्याचा आरोप आहे. चीनी राष्‍ट्राध्‍यक्ष शी ज‍िनपिंग यांच्या भेटीनंतर झिन्झिंएंगमध्‍ये दोन हल्ल्याच्या घटना घडल्या. हल्लेखोरांचा पाठलाग करा आणि त्यांना चांगला धडा शिकवा असे आवाहन चिनी राष्‍ट्राध्‍यक्षांनी आपल्या दौरा दरम्यान केले.
हल्ल्यांचा घटनाक्रम
- उरूकी प्रातांत 5 मे रोजी अतिरेकी हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू
- मार्च 2014 मध्‍ये यानमेन रेल्वे स्थानकावर झालेल्या चाकू हल्ल्यात 29 लोकांचा आणि चार हल्लेखोरांचा अंत झाला.
- जून 2013 मध्‍ये झालेल्या साखळी संघर्षामुळे जवळजवळ 35 लोकांचा जीव गेला.