आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Six year old Chinese Boy To Get Artificial Ear, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहावर्षीय चिनी मुलास मिळणार कृत्रिम कान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- संतापाच्या भरात भाजी कापण्याच्या सुरीने मावशीने कान कापून काढलेल्या सहावर्षीय मुलावर शस्त्रक्रिया करून कृत्रिम कानाचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील या सहावर्षीय मुलावर त्याच्या मावशीने केलेल्या चाकूहल्ल्यात डावा कान कापला गेला होता, तर हनुवटी आणि उजव्या कानाला गंभीर दुखापत झाली होती. शियांगयांग शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना गेल्या महिन्यात त्याचा हा कान कापून काढावा लागला होता. आता या मुलाच्या डाव्या बाजूच्या कानाच्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून कृत्रिम कान बसवण्यात येणार असल्याचे त्या मुलाचे वडील वांग झियांग यांनी सांगितले. कान कापावा लागला असला तरी त्याला ऐकू येण्यावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबात वादावादी झाल्यानंतर संतापलेल्या मावशीने या चिमुरड्याच्या कानावर चाकूने हल्ला केला होता.