आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा महिन्यांच्‍या बाळास चांगल्या-वाईटाचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तुम्हाला वाटते त्यापेक्षाही तुमचे बाळ जास्त हुशार असते. नव्या तंत्रज्ञानानुसार लहान बाळासोबत बोलताना त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, याची माहिती शास्त्रज्ञांना मिळू शकते. सहा महिन्यांपर्यंतची मुले शक्यतांच्या आधारावर अंदाज लावण्यात सक्षम असतात. संशोधकांनी या मुलांना अनेक प्रकारचे हावभाव असलेले चेहरे दाखवले तेव्हा भीतीदायक चेह-यांकडे मुलांनी टक लावून पाहिले.एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणेच त्यांची वर्तणूक होती. भावनिक विश्लेषणाचे हे पहिले संकेत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

टाळ्या वाजवण्यासारख्या क्रियांमुळे लहान मुले खुश होतात. असे केल्यामुळे बाळाच्या मेंदूत प्लेझर सेंटर तयार होते. आता नव्या तंत्रज्ञानानुसार लहान बाळाच्या मेंदूत काय सुरू आहे, याचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. आजूबाजूच्या वातावरणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, याचाही शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. सिअ‍ॅटलमधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील इन्स्टिट्यूट फॉर लर्निंग अँड ब्रेनचे सहसंचालक पॅट्रिशिया कुहल सांगतात की, लहान बाळाचा मेंदू हे एक रहस्य आहे. या रहस्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे आहे. यासाठी आमच्या संस्थेतील शास्त्रज्ञ मॅग्नेटो-एनसेफॅलोग्राफी किंवा एमईजीद्वारे काही प्रयोग करत आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे शास्त्रज्ञ मेंदूच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांची नोंद घेतात. या प्रक्रियेत मुलांना ब्यूटी सलूनमधील हेअर ड्रायरसारख्या एका उपकरणाखाली बसवले जाते.
संगोपनादरम्यान लहान मुले भावना आणि भाषांचे विश्लेषण कसे करतात, हे जाणणे आवश्यक असते. यामुळे लहान मुलांना शिकताना येणा-या अडचणींची कारणेही कळू शकतील. प्रौढांच्या तुलनेत लहान बाळाच्या मेंदूचा आकार 25 टक्केच असतो. एक वर्षापर्यंत वेगाने वाढून तो 70 टक्के होतो आणि तीन वर्षांपर्यंत आणखी वाढून 85 टक्क्यांपर्यंत विस्तारतो. त्यामुळे लहानपणातील अनुभवांचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो.

wsj.com