आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आकाश स्वच्छते’साठी चीनचे केविलवाणे प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
>अपेक परिषदेदरम्यान कोट्यवधी वाहने थांबवली
>हजारो कारखाने, सरकारी कार्यालयांना टाळे

बीजिंग- चीनमध्येनुकत्याच पार पडलेल्या एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अर्थात अपेक राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान इकोफ्रेंडली वातावरणनिर्मितीसाठी ११.७ दशलक्ष वाहने बंद ठेवण्यात आली. तसेच दहा हजारांहून अधिक कारखाने बंद ठेवण्यात आले.

अपेक ब्ल्यू अर्थात निळे आकाश दिसण्यासाठी या काळात ४.३४ लाख सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली. या परिषदेत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांसह अनेक देशांतील प्रतिनिधींनी हजेरी लावली. परिषदेदरम्यान प्रदूषण निर्मिती कमी करण्यासाठी चीनने व्यापक व्यवस्थापन हाती घेतले होते. ते १० नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अपेक परिषदेनंतर चीनमधील वाहने आणि कारखाने पूर्ववत सुरू झाले असून येथील प्रदूषणाची पातळीही नेहमीप्रमाणे मर्यादेबाहेर गेली आहे. शनिवारी अमेरिकन वकिलातीने दर्शवलेली प्रदूषणाची पातळी २९६ पर्यंत नोंदवली गेली.

स्वच्छतामोहिमेत राष्ट्राध्यक्ष अन् पंतप्रधानांचे मार्गदर्शन
चीनच्यापर्यावरण संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एका वर्तमानपत्रातून ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग, पंतप्रधान ली केजिआंग आणि उपपंतप्रधान झँग गाओली यांनी या ‘स्वच्छता’ मोहिमेत प्रत्यक्ष लक्ष घातले होते. विशेष म्हणजे चीनमधील प्रदूषणाची पातळी दर्शवणाऱ्या सरकारी अॅपमध्ये अमेरिकन वकिलातीचा डाटाही दर्शवण्यास संबंधित कंपनीला मनाई केली होती.
एवढी ‘चाके’ थांबवली
>अपेकपरिषदेदरम्यान इको- फ्रेंडली वातावरणासाठी चीनने १० हजार कारखान्यांमधील उत्पादन थांबवले
> ३९ हजार कारखान्यांना काही तासच काम करण्याची मुभा देण्यात आली.
> ११.७ दशलक्ष वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घातली होती.
> बीजिंगमधील पर्यावरण निरीक्षण केंद्रानुसार, ते १२ नोव्हेंबरदरम्यान प्रदूषकांनी गेल्या पाच वर्षातील सर्वात नीचांकी पातळी गाठली.