आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sky Foll Hollywood Movies At Shirtless Bond Krete

शर्टविना बॉण्डचा पहिला फोटो; क्रेगने दाखवले पिळदार शरीर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस: स्कायफॉल हा आगामी चित्रपट आणि त्यातील बॉण्डची भूमिका या विषयी प्रचंड उत्सुकता असतानाच रविवारी बॉण्डचा अधिकृत फोटो जाहीर करण्यात आला. त्या फोटोमध्ये शर्टाविना असलेल्या डॅनिएल क्रेगने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे दर्शन घडवले आहे.
निळ्याशार पाणी असलेल्या स्वीमिंग पूलच्या सोबतीने क्रेगचा पाठमोरा फोटो काढण्यात आला आहे. 43 वर्षीय अभिनेत्याचे हे छायाचित्र अलीकडेच काढण्यात आले आहे. सलग तिस-या बॉण्डपटात क्रेगची भूमिका आहे. कॅसिनो रॉएल (2006), क्वाँटम आॅफ सोलास (2008) या चित्रपटातून क्रेगने काम केले आहे.
आगामी चित्रपटात बॉस एम यांच्याविषयी किती प्रामाणिक आहे, हे पाहायला मिळणार आहे. सॅम मेंडिस स्कायफॉलचे दिग्दर्शक आहेत. जॉन लागान, रॉबर्ट वेड व नील परवीस यांनी पटकथा लिहिली आहे. ज्युडी डेंच याच बॉण्डच्या बॉस असतील. जेव्हिएर बर्डेम हे मुख्य खलनायक रंगवणार आहेत. नाओमी हॅरिस, बेरेनाईस मार्लाह, राल्फ फिएन्स, अल्बर्ट फिन्नी, बेन विशॉ, ऑला रापेस यांच्याही यात भूमिका आहेत. स्कायफॉल हा चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.