आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Slamic Clerics Issue Fatwa Against Living On Mars

मंगळावर जाऊन राहणे इस्लाम धर्माविरूद्ध असल्याचा दुबईत फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या मंगळावर राहणे शक्य नसले तरी संयुक्त अरब अमीरातने( युएइ) एक फतवा काढला आहे. या फतव्यानूसार मंगळावर राहणे हे इस्लाम धर्माविरूद्ध आहे.

हा फतवा जनरल अथॉरिटी ऑफ इस्लामिक अफेअर्स अ‍ॅण्ड अ‍ॅंडोवमेटने जारी केलेला आहे. मंगळावर मानवी वस्ती तयार करणार असल्याची घोषणा मार्स वन ऑर्गनाइझेशनने केली आहे. दुबईमध्ये काढलेल्या फतव्यानुसार मंगळावर राहणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. इस्लाम धर्मात हे मान्य नाही. खलिज टाइम्सने दिलेल्या माहितीनूसार फतव्यामध्ये असा उल्लेख आहे, की मंगळावर एकतर्फी यात्रा करणे हे धोक्याचे आहे. इस्लाममध्ये याला मान्यता देता येणार नाही.