आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीची गाढ झोप मधुमेह, कॅन्सर यांसह अनेक आजारांना ठेवते दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री आपण झोपतो तेव्हा वाटते की, आपले शरीर ढिले पडले आहे. ते आत्मसमर्पणाच्या अवस्थेत आहे. मेंदूने विचार करणे सोडून दिले आहे. आपण सर्व आपल्या काना-नाकाच्या हवाली करून टाकतो. सकाळी उठल्यावरच आपण पुन्हा सक्रिय होतो. परंतु शास्त्रज्ञ सांगतात की, वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. खरे हे आहे की, दिवा विझल्याबरोबर आपला मेंदू काम करू लागतो. फक्त त्याची हालचाल जागृत अवस्थेपेक्षा वेगळी असते. रात्री मेंदूच्या पेशींची फौज एखाद्या प्रशिक्षित तुकडीसारखे काम करते. इलेक्ट्रिकल संकेतांसोबत मेंदूची स्वच्छता करते. त्यांचा संमोहन प्रभाव मेंदूला आराम देतो.

झोपेत मेंदू हार्मोन्स, एन्झाइम्स आणि प्रथिनांचे संतुलन राखतो. यादरम्यान, डेटा प्रोसेसर दिवसभर गोळा केलेली माहितीची छाटणी करतात. अनावश्यक विषारी कचरा, खरकटे बाहेर टाकले जाते. हा कचरा निघाला नाही तर सर्व प्रकारच्या अडचणी तयार होऊ शकतात. झोप निसर्गाची देणगी आहे. एखाद्या औषधाच्या तुलनेने शरीर आणि मेंदूला पुरेसे सुदृढ ठेवण्यात प्रभावशाली असते. प्रत्येक रात्री सात-आठ तास झोप घेतल्यास एकाग्रता सुधारते. स्मरणशक्ती आणि नियोजनाचे कौशल्य वाढते. चरबी जाळण्याची आणि वजन नियंत्रित करण्याची व्यवस्था शाबूत राहते. आपणा सर्वांना पुरेशी झोप मिळाली तर वजन ठीक राहील. टाइप-२ प्रकारच्या मधुमेहाची शक्यता कमी राहील. अस्वस्थतेशी दोन हात करण्याची क्षमता चांगली राहील.

अल्झायमर, हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) आणि कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो. रात्री मोबाइल फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपसह कोणत्याही प्रकारचा प्रकाश आपल्या शरीराचे घड्याळ विस्कळीत करू शकतो. आपला मेंदू निर्बुद्ध बनतो. त्याला वाटते, दिवसाची वेळ आहे. त्यामुळे तो झोपेचे संकेत ऐकत नाही. रात्री आरामाच्या वेळी भले ताजेतवाने वाटत असेल तरीदेखील झोपेबद्दल जागृत राहत नाहीत. आपल्याला वाटते, दिवसा थोडे सुस्त राहणे वाईट दिसते, पण हानिकारक नाही. पुरेशी झोप न झाल्यामुळे कर्मचारी आजारी पडण्याची शक्यता दुप्पट वाढते.

आरोग्यतज्ज्ञांना वाटते, मेंदूला श्वास घेण्यासाठी झोप ही एकमेव वेळ असते. असे न झाल्यास तो आपल्या जैविक कचर्‍यात अडकून पडतो. हा कचरा प्रचंड श्रम घेणार्‍या पेशी आणि निरुपयोगी झालेल्या अणूंनी बनतो. पेन्सिल्वानिया विद्यापीठात औषधशास्त्राचे प्राध्यापक आणि निद्रातज्ज्ञ डॉ. सिगरीड व्हिसे म्हणतात, शरीराचा अधिकाधिक वापर करावा, असे सर्वांना वाटते. झोप याच्या आड येते. तरीही आपण समजले पाहिजे की, सिस्टिम किती ताणली जाऊ शकते.

संशोधनातून डॉ. व्हिसे यांना कळले की, प्रत्येक रात्री आवश्यक आराम न करणार्‍या मेंदूच्या पेशी दोन पाळ्यांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसारख्या आहेत. अतिश्रमाने थकतात. उंदरांवरील शोधाने त्यांना कळले की, मेंदू सतर्क ठेवणार्‍या न्यूरॉन्स एनर्जी बायप्रॉडक्टच्या रूपात विषमुक्त रॅडिकल्स सोडतात. ते मेंदूतून विषारी तत्त्वांची स्वच्छता करतात. झोप पूर्ण न झाल्याने पेशी अँटीऑक्सिडन्ट निर्मिती बंद करतात. काही पेशी तर मरतात. मेंदूच्या पेशी एकदा संपल्यानंतर परत येत नाहीत.

रोचेस्टर विद्यापीठात न्यूरोमेडिसिन केंद्राच्या सहसंचालक डॉ. मॅकेन नेडरगार्ड यांनी मेंदूवरील झोपेच्या परिणामांवर संशोधन केले आहे. त्यांनी पाहिले की, मेंदूच्या ग्लायल नामक पेशी झोपेत कचरा बाहेर टाकणार्‍या विशाल पंपाची भूमिका करतात. शरीराचे इतर अवयव निष्क्रिय होताच ग्लायल पेशी वेगाने सक्रिय होतात. मेंदूच्या विद्युत गतिविधी आपल्या सर्वाधिक व्यस्त वेळेच्या तुलनेत एकतृतीयांश कमी होतात. मेंदूच्या पेशी (न्यूरॉन्स) आकुंचन पावल्यामुळे आणि मज्जारज्जूच्या द्रवाला येण्या-जाण्यास जास्त जागा मिळते. नेडरगार्ड म्हणतात, हे डिश-वॉशरसारखे काम करते. ते सतत स्वच्छता करते. आपण जागे असतानाही सफाई चालू असते. मात्र, ती घटून १५ टक्के झालेली असते. न्यूरॉन्स पसरल्याने ग्लायल पेशींना जागा कमी मिळते.

नेडरगार्ड व्हिसे यांच्या संशोधनातून संकेत मिळतात की, वृद्धांना अल्झायमर होण्याचा धोका अधिक का असतो, मेंदूत एमिलॉइड प्रोटीन साफ न झाल्याने अशी स्थिती निर्माण होते. नेडरगार्ड म्हणतात, वृद्ध मेंदूत कचरा साफ करण्यासाठी आवश्यक प्रवाहाची स्थिती बनू शकत नाही. मेंदूत गोळा कचरा सुदृढ पेशींवर परिणाम करतो. -सोबत मेंडी ओकलेंडर, अॅलेक्झांड्रा सिफरलीन

सात ते नऊ तासांची झोप आवश्यक
झोपेअभावी होणार्‍या दुष्परिणामांची पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण या समस्येकडे डोळेझाक करतो. अमेरिकेसहित बहुतांश देशांमध्ये प्रौढ व्यक्ती प्रत्येक रात्री सात ते नऊ तासांची आवश्यक झोप घेऊ शकत नाही. नियमित आणि नैसर्गिक झोपेचा इतर पर्याय नाहीच. आठवड्याच्या शेवटी पुरेशी झोप घेऊन इतर दिवसांच्या कमी झोपेची भरपाई होऊ शकते का, या मुद्द्यावर वाद सुरू आहे. एखाद्या दिवशी भरपूर झोप घेतल्याने शरीराला लाभ तर होतो, परंतु ते नियमित झोपेला पर्याय ठरू शकत नाही. त्याचप्रमाणे झोपेच्या गोळ्या खाऊन गाढ झोप घेण्यानेदेखील फायदा होत नाही. झोपेची गोळी मेंदूच्या एकाच भागाला प्रभावित करते. रोज नियमितपणे झोपावे व उठावे हीच आदर्श पद्धत आहे. शरीराचे नैसर्गिक चक्र टिकवून ठेवण्यासाठी दिवसा नैसर्गिक उजेडाच्या संपर्कात राहावे. योग, व्यायाम, पुस्तक वाचणे आणि अंघोळ या उपायांनी आपण चांगली झोप घेऊ शकतो.

म्हातारा होत असतो मेंदू
संशोधनानुसार, झोपेअभावी एखाद्या किशोरवयीन किंवा विशीतील व्यक्तीचा मेंदू वयस्कर व्यक्तीसारखा व्यवहार करू लागतो. लॉस एंजलिस जीववैद्यक संशोधन संस्थेत औषधशास्त्राचे प्राध्यापक डॉ. पीटर लियू सांगतात, दीर्घकाळ न झोपण्याने शरीरावर दाब पडू लागतो. कौटुंबिक कलह, आर्थिक अडचण, नोकरीशी संबंधित प्रश्नच झोप न येण्याचे कारण असते. जीवनपद्धतीतील बदलाचा परिणाम आहे हा. आपण प्रत्येक मिनिटाला फोन चेक करतो. मुलांच्या काळजीत असतो. टीव्ही, संगणक स्क्रीनसमोर ठेवल्याशिवाय रिलॅक्स होत नाही.

त्यामुळे कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स नियमितपणे पाझरतात. कृत्रिम उजेड आणि स्क्रिनसमोर जाणारा वेळ आपले आतले घड्याळ विस्कळित करतो. शरीर नैसर्गिकपणे झोपणे विसरून जाते.

झोपेत असताना काय करते आपले शरीर
दिवसा आपले शरीर आपली देखभाल करण्याऐवजी दुसर्‍या कामांवर जास्त लक्ष देते. आपण झोपतो तेव्हा स्थिती बदलते. पूर्ण ऊर्जा पेशींची डागडुजी, चांगल्या प्रथिनांची निर्मिती आणि इतर आवश्यक कामांमध्ये गुंतलेले असते.
हाडे - हाडांची निर्मिती सघनतेने चालत असते. त्यांची तूट-फूट नियमितपणे दुरुस्त होत असते.
स्वादुपिंड - झोपेशिवाय आपण आपल्या आहारातील साखर व्यवस्थितपणे पचवू शकत नाही.
त्वचा - त्वचेच्या पेशी वेगाने वाढतात. हानी होत असेल तर भरपाई होऊन जाते. लवचिकता कायम राहते.
मेंदू - मस्तिष्कच्या पेशी आकुंचन पावतात. दिवसभर गोळा होणारा कचरा काढून टाकतात.
मांसपेशी - स्नायूंना झालेले घाव किंवा इजा भरून निघण्याचे काम झोपेच्या अवस्थेत वेगाने होते.