आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निजलेल्या बाळाजवळ वसवली स्वप्ननगरी, त्यावर माहितीपटही साकारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस - आपल्या लेकराचे बालपण सदैव स्मरणात राहावे यासाठी तैवानी वंशाच्या मुक्त कलाकार सिओन क्विनी लियानोने कॅलिफोर्नियात एका अनोख्या कल्पनेचा वापर केला आहे. तीन महिन्यांचा मुलगा वेनगेन जेव्हा झोपतो, तेव्हा सिओन त्याच्या आसपास परीकथेतील सृष्टी उभारून त्याचे छायाचित्र काढते. तिने स्कर्टपासून चांदोमामा, बेल्टपासून साप हुबेहूब साकारला. यासाठी बाजारातून विशेष खरेदी केली नाही. वेनगेन आकाशातील तारे तोडत असताना, तर कुठे गारुड्याच्या रूपात छायाचित्रात दिसत आहे. चांगले छायाचित्र मिळवण्यासाठी कधीकधी तीन-चार दिवस वाट पाहावी लागल्याचे सिओनने सांगितले. अशा 100 छायाचित्रांवर त्यांचे स्लीपिंग बेबी पुस्तक तैवानमध्ये प्रकाशित झाले आहे. याची इंग्रजीतील आवृत्तीही काढली जात आहे. बीबीसीने या संपूर्ण छायाचित्र मालिकेवर एक माहितीपट तयार केला आहे.