आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या पालन-पोषणाचा व्यवस्थापन फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंडा रोटेनबर्ग आणि ब्रुस फेलर आपल्या सात वर्षांच्या जुळ्या मुलींचे पालनपोषण नव्या पद्धतीने करण्यास इच्छुक होते. फेलरने पारंपरिक ‘पॅरेंटिंग गाइड’ची मदत घेतली. परंतु त्यात दिलेल्या टिप्स त्यांना जुनाट वाटल्या. उद्योग व्यवस्थापनात अशा अनेक क्लृप्त्या आहेत की ज्या इथेही वापरता येऊ शकतात याची त्यांना जाणीव झाली, म्हणजेच नियमित बैठका, टीम स्थापन करण्यासंबंधी घडामोडी, इतकेच नाही तर ‘मिशन स्टेटमेंट’ ज्यात कुटुंबाच्या सामूहिक ध्येयांविषयीची माहिती दिली जाईल.

‘द सिक्रेट्स आॅफ हॅपी फॅमिलीज’ या आपल्या पुस्तकात फेलर कौटुंबिक जीवनात व्यवस्थापनाच्या तांत्रिक वापराविषयी माहिती देतात. यात मुलांच्या पालनपोषणाला एखाद्या पदवीधर शाळेच्या केस स्टडीप्रमाणे स्पष्ट करण्यात आले आहे. अडचणींवर माहितीआधारित उपाय काढण्यावर भर दिला गेला आहे. अशाच प्रकारे ‘फॅमिली इंक’ नावाच्या पुस्तकात कॅटलिन आणि अँड्रू फ्राइडमॅन संचालक मंडळाच्या बैठकाच्या धर्तीवर वार्षिक बैठकीचा सल्ला देतात. ज्यात बेबीसीटर्स, नॅनीज आणि हाऊसकीपर्सना कर्मचारी मानले जावे आणि त्यांच्यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापन सिद्धांतावर आधारित प्रशिक्षणाची तरतूद असावी.

कॅटलिन फ्राइडमॅन सांगतात, जर तुम्ही घरालाही व्यवसायाप्रमाणे चालवाल तर तुमची कार्यक्षमता वाढू शकते. ओहियो स्टेटमध्ये मनुष्यविज्ञान विषयाच्या सहायक प्राध्यापिका सारा स्कोप-सुलिवन यांच्या मते, माहितीवर आधारित हे मॉडेल लोकांना आवडत आहे. लोक वर्क अ‍ॅट होम, होम अ‍ॅट वर्कची यापूर्वीच चर्चा करत असत, व्यवस्थापन सिद्धांताचा उपयोग करत या विरोधाभासाला कमी केले जाऊ शकते.

कुटुंबाचे ब्रँडिंग, पाच वर्षांच्या मुलांसाठी जबाबदा-यांची चेक लिस्ट, मुलांच्या पालन-पोषणासाठी व्यवस्थापनावर आधारित पद्धती काही पालकांना अवास्तव वाटू शकतात. ‘द सिक्रेट ऑफ हॅपी फॅमिलीज’मध्ये फेलर कुटुंबांचे उत्पादन वाढवण्यासाठी एजाइल डेव्हलपमेंट, जे सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्हचे आवडीचे शस्त्र आहे, याचा उपयोग करण्याचा सल्लाही देतात. एजाइल तंत्रज्ञानात आठवडा बैठकीची व्यवस्था आहे. ज्यात तीन सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. फेलर या तंत्रज्ञानाला कुटुंबाच्या गरजेनुसार अवलंबण्याचा सल्ला देतात. ज्यात या तीन प्रश्नांवर चर्चा व्हावी. या आठवड्यात कुटुंबात काय चांगले घडले? या आठवड्यात कुटुंबात काय वाईट घडले? आगामी आठवड्यात आपण काय काम करणार? पालकांना समजायला हवे की, आता व्यवसायावर आधारित पद्धती मुलांच्या जीवनाशी निगडित इतर क्षेत्रांतही प्रवेश करत आहेत.