आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट छत्री पाऊस मोजणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - छत्रीच्या साह्याने पाऊसमानाची माहिती मिळवता येईल, असे उपकरण असलेली स्मार्ट छत्री विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे.

नेदरलँडच्या डेल्ट तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक रॉल्फ हट यांनी स्मार्ट छत्रीचा दावा केला आहे. हवामान विभागाकडून वापरण्यात येणार्‍या पाऊस मापन तंत्राचाच वापर या उपकरणात करण्यात आला आहे. उपकरणात विशिष्ट प्रकारच्या सेन्सरचादेखील उपयोग करण्यात आला आहे.

छत्रीमध्ये पिझो नावाचे एक फीचर आहे. या फीचरची मापनात महत्त्वाची भूमिका आहे. छत्रीवर पडणार्‍या पावसाच्या थेंबांमुळे होणार्‍या कंपनाचे मोजमाप करण्याचे काम या फीचरमार्फत केले जाते. ही सर्व यंत्रणा लॅपटॉपला जोडलेली असते. स्मार्ट छत्रीवर हट यांनी आपल्या प्रयोगशाळेत चाचणी घेतली. कमी पावसात ही स्मार्ट छत्री वापरण्यात आली. त्यातून कमालीचे उत्साहवर्धक निष्कर्ष हाती आले आहेत.