आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphone News In Marathi, White House, Radar, Security, Blackberry

सर्वच स्मार्टफोन आता व्हाइट हाऊसच्या रडारवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सुरक्षेच्या कारणास्तव व्हाइट हाऊसमध्ये आता सर्व स्मार्टफोनची कडक तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात हाय प्रोफाइल ब्लँकबेरीसह सॅमसंग, एलजी फोनचाही समावेश आहे. व्हाइट हाऊसमध्ये सर्वाधिक ब्लॅकबेरी वापरण्यास प्राधान्य दिले जाते. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडेदेखील ब्लॅकबेरीचा स्मार्टफोन आहे; परंतु सुरक्षेच्या कारणावरून व्हाइट हाऊसच्या कम्युनिकेशन एजन्सीने अंतर्गत पातळीवर तंत्रज्ञानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

तपासणीचा हा प्राथमिक टप्पा आहे. त्यामुळे एवढ्यात कोणत्याही प्रकारची नवीन अंमलबजावणी केली जाणार नाही. अर्थात इतक्यात ओबामा ब्लॅकबेरी बदलणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पेंटागॉनने निवडक स्मार्टफोन तपासणीसाठी घेतले आहेत. गेल्या एक दशकापासून अमेरिकेतील संवाद व्यवस्थेत ब्लॅकबेरीचे महत्त्व टिकून होते. अमेरिकेच्या अत्युच्च सुरक्षा प्रणालीस अनुकूल अशी वैशिष्ट्ये ब्लॅकबेरीमध्ये असल्याने त्याचा दर्जा मान्य करण्यात आला होता.