आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन यूजर 150 वेळा तपासतात मोबाइल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लंडन - लोकांचे मोबाइलवरील अवलंबित्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. वाचून आश्चर्य वाटेल. परंतु स्मार्टफोनचा वापर करणा-या लोकांना तो दिवसातून किमान 150 वेळा तपासल्याशिवाय राहावत नाही.

प्रत्येक सहाव्या मिनिटाला त्यांना स्मार्टफोन बघावा असे वाटते. सोळा तासांमध्ये स्मार्टफोनचा अधिक वापर केला जात असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे. अनेक लोक स्मार्टफोनला अलार्म म्हणूनही वापरतात. इंटरनेट सर्फिंग, इ-मेल तपासणे किंवा आलेले कॉल, मेसेज जाणून घेण्यासाठी त्याचा अधिक वापर होतो. सामान्यपणे लोक दिवसाला सरासरी 22 कॉल टाळतात तर 23 वेळा ते संदेश पाठवण्याचे काम करतात. दिवसातून सरासरी तीन वेळा कॉल करण्याची लोकांना सवय असल्याचे दिसून आले आहे. 18 तासांच्या कालावधीमधील फोनचा वापर आणि लोकांच्या सवयींचे निरीक्षण यातून करण्यात आले आहे, असे मोबाइल टेक्नॉलॉजी कन्सल्टंट टोमी अ‍ॅहोनेन यांनी सांगितले.अलार्म, गेम, गाणी, फोटो काढणे आदीसाठीही स्मार्टफोनचा वापर केला जातो.