आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smartphone Uses In Night Affect Next Day Productivity

रात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास दुस-या दिवशी उत्पादकतेवर परिणाम होतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - स्मार्टफोनचा रात्री नऊनंतर वापर केल्यामुळे कर्मचा-यांचे कामातील लक्ष कमी होऊन त्याचा दुस-या दिवशी उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी स्मार्टफोनचा वापर टाळावा, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन फॉस्टर स्कूल ऑफ बिझनेस यांच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट झाली आहे, अशी माहिती ख्रिस्तोफर बार्न्स यांनी दिली.
गाढ झोप ही ताजेतवाने होण्यासाठी बॅटरीसारखी ऊर्जा देण्याचे काम करते; परंतु रात्री नऊनंतर स्मार्टफोनमध्ये मग्न राहिले तर झोपेचे खोबरे होते आणि कार्यालयीन पातळीवर दुसरा दिवसही खराब ठरतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. दुस-या दिवशी कार्यालयीन कामात योग्य ते परिणाम दिसून येत नाहीत. स्मार्टफोन झोपमोड करणारे ठरतात.