आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हाईट हाऊसवर फेकला बॉम्‍ब फेकला, तपास यंत्रणा अंधारात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्‍टनः अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचे निवासस्‍थान असलेल्‍या व्‍हाईट हाऊसवर स्‍मोक बॉम्‍ब फेकण्‍यात आला. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. व्‍हाईट हाऊसला पूर्णपणे सील करण्‍यात आले असून परिसराची कसून तपासणी करण्‍यात येत आहे. तपास संस्‍थांना अद्याप कोणत्‍याही प्रकारचा सुगावा लागलेला नसून बॉम्‍ब फेकणा-याचा शोध सुरु आहे.
व्‍हाईट हाऊसच्‍या बाहेर एक रॅली काढण्‍यात आली होती. त्‍यात सुमारे 1000 जणांचा सहभाग होता. निदर्शकांकडून अचानक व्‍हाईट हाऊसच्‍या आवारात स्‍मोक बॉम्‍ब फेकण्‍यात आला. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, काल रात्री उशीरा ही घटना घडली. अमेरिकेत 'वॉल स्‍ट्रीट अकुपाय' आंदोलन सुरु आहे. त्‍यापैकी काही आंदोलकांनी व्‍हाईट हाऊसच्‍या बाहेर ठिय्या दिला आहे. व्‍हाईट हाऊसच्‍या उत्तरेकडील संरक्षक भिंतीकडून बॉम्‍ब फेकण्‍यात आला. ही घटना घडली त्‍यावेळी अध्‍यक्ष बराक ओबामा व त्‍यांची पत्‍नी मिशेल हे व्‍हाईट हाऊसमध्‍ये नव्‍हते. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली असून सुरक्षा संस्‍थांनी कसून तपास सुरु केला आहे. परंतु, अद्याप कोणालाही ताब्‍यात घेण्‍यात आल्‍याचे वृत्त नाही.
मिशेल ओबामा यांच्‍या वाढदिवसानिमित्त काल बराक ओबामा त्‍यांना डिनरला घेऊन गेले होते. त्‍यांच्‍यासमवेत काही पत्रकारही होते. ते परतल्‍यानंतर पत्रकारांना व्‍हाईट हाऊसच्‍या बाहेर पडू दिले नाही. सुमारे पाऊण तासानंतर व्‍हाईट हाऊसच्‍या अधिकारी त्‍यांना सुखरुप बाहेर घेऊन आले.
अमेरिकेत 'ऑक्युपाय वॉल स्ट्रीट' आंदोलन
ठिय्या : वॉल स्ट्रीट ते दलाल स्ट्रीट ?
व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार; राष्ट्राध्यक्ष ओबामा सुरक्षित