आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smoking Ban In Public Has Led To 10 Percent Fall In Premature Births

धूम्रपान बंदीमुळे मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी घातल्याचे चांगले परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसू लागल्याचे एका आंतरराष्ट्रीय पाहणीत आढळून आले आहे. धूम्रपान बंदीमुळे अकाली जन्म आणि अस्थमाच्या प्रमाणात लक्षणीय घट आढळून आली आहे.

धूम्रपानमुक्तीचा कायदा लागू केलेल्या देशांमध्ये अवघ्या एका वर्षातच मुलांचा वेळेआधी जन्म आणि मुलांना होणार्‍या अस्थमाच्या आजारामध्ये 10 टक्के घट झाली आहे. संशोधकांच्या चमूने यापूर्वी उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये झालेल्या 11 अध्ययनांचे विश्लेषणही केले आहे.

धूम्रपान बंदी कायदा लागू केलेले देश आणि राज्यांमधील लोकांच्या आरोग्यावर पडलेला प्रभाव तपासून पाहण्यासाठी करण्यात आलेले हे सर्वात मोठे संशोधन आहे.