आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल मेसेज पाठवा अन् धूम्रपानाची सवय सोडवा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- तुम्हाला धूम्रपान सोडायचे आहे? मग केवळ विशिष्ट संदेश रिमाइंडर म्हणून ठेवला पाहिजे. त्यात धूम्रपान सोडण्यास सांगण्यात आलेले असावे, जेणेकरून वारंवार हा संदेश पाहिल्यामुळे व्यक्ती या व्यसनापासून आपोआपच दूर जाते, असा दावा करण्यात आला आहे.
धूम्रपानविषयक संशोधन प्रकल्पात सहा महिने व्यसन असलेल्या व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. धूम्रपानाचे व्यसन असलेल्या 11 टक्के जणांनीच त्यात संदेश कार्यक्रमाची व्यसन सोडवण्यासाठी मदत घेतली होती. यातील 5 टक्के व्यक्तींना त्याचा फायदाही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मिल्कन इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या वॉशिंग्टन विद्यापीठांतर्गत संस्थेतील संशोधकांनी हा निष्कर्ष काढला. धूम्रपानाची सवय मोडण्यासाठी फोनच्या माध्यमातून समुपदेशन करण्याचा मार्गदेखील नागरिकांकडून चोखाळला जातो, परंतु त्याचा फारसा फायदा होत नाही, अशा तक्रारी आढळून आल्या आहेत. परंतु टेक्स्ट टू क्वायट नावाच्या कार्यक्रमातून मात्र सिगारेटचे व्यसन सोडणे शक्य होणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.

संदेशातील सातत्य महत्त्वाचे
टेक्स्ट मेसेजचे रिमाइंडर अधूनमधून निश्चितपणे युजरच्या समोर आले पाहिजे. त्यानंतरच त्याचा व्यसन सोडवण्यासाठी फायदा होऊ शकेल.