आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूम्रपानातून क्षयरोग होण्याचा धोका दुप्पट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - दैनंदिन तंबाखूयुक्त धूम्रपान करणार्‍यांसाठी हा इशारा आहे. अशा व्यक्तींनी पूर्वी क्षयरोगावर यशस्वी उपचार केले असले तरी तो पुन्हा बळावण्याची शक्यता दुपटीने वाढते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

तंबाखूजन्य धूम्रपान आणि क्षयरोग यांच्यातील आंतरसंबंध स्पष्ट व्हावा यासाठी संशोधकांनी हा अभ्यास केला. फुप्फुसाच्या आजारावरील अभ्यासात ही बाब दिसून आली आहे. तंबाखू व्यक्तीच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असते हे त्यातून दिसून आले आहे, असा दावा तैपेई नॅशनल यांग-मिंग विद्यापीठातील डॉ. चंग-ये डेंग यांनी केला आहे. टीबी झाल्यानंतर फार मोठय़ा गुंतागुंतीच्या उपचाराची गरज भासत नाही.

हाफ पॅक बंद करा !
धूम्रपानाची सवय असलेले लोक वैयक्तिक पातळीवर अनेकदा दिवसांतून 10 किंवा त्यापेक्षा अधिक सिगारेट्स ओढतात. अर्थात, त्याला हाफ पॅक म्हटले जाते. ही तत्काळ बंद करणे गरजेचे आहे.