आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूम्रपान करामुळे वाचतील 90 लाख लोकांचे प्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - धूम्रपान रोखण्यासाठी भारताने कठोर उपाययोजना केल्या आणि तंबाखूवर जादा कर लावला तर पुढील दशकांत देशात 90 लाख लोकांचे प्राण वाचू शकतील. एका नव्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार धूम्रपानविरोधी कायदा कडक करून व तंबाखूवर कर वाढवल्यास भविष्यात हृदयरोगापासून होणा-या मृत्यूला आळा बसू शकतो.

पीएलओएस या औषधविषयक नियतकालिकामध्ये याबाबत अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यानुसार भारतात तंबाखूमुक्त कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 2009 व 2010 मध्यसे प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक जण कार्यालयात धूम्रपानाच्या विळख्यात सापडल्याचे म्हटले आहे. तंबाखूमुक्त समाजनिर्मितीसाठी सरकारकडून अत्यल्प निधी उपलब्ध करून दिला जातो. आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यक्ती नागरिकांना तंबाखू मुक्तीसाठी योग्य तो सल्ला देत नाहीत. देशात तंबाखूवर कमी कर लावला जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे.