आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Snake That Killed Two Kids Had Escaped Its Enclosure Before

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजगराच्या मिठीत दोन भावांचा गुदमरून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरंटो - 14 फूट लांब आणि 45 किलो वजनाच्या एका अजगराच्या विळख्यात दोन चिमुकल्या भावांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कॅनडाच्या न्यू ब्रुन्सविक शहरात घडली. दोन्ही चिमुकल्यांचा शनिवारी एकाच शवपेटीत दफनविधी करण्यात आला. अत्यंत दुर्दैवी आणि विचित्र घटनेमुळे हळहळ व्यक्त करीत शहरातील सुमारे हजार ते बाराशे नागरिक दफनविधीसाठी हजर होते.

नोहा (वय 4 ) आणि कॉनर बार्थ (वय 6 ) अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. गेल्या रविवारी ते आपल्या मित्राकडे राहण्यासाठी गेले होते. मित्राचे वडील जीन क्लाउडी सॅव्होई यांचे न्यू ब्रुन्सविक येथील कॅम्पबेल्टन भागातील अपार्टमेंटमध्ये पाळीव प्राण्यांचे दुकान आहे. या दुकानात विविध प्राण्यांसोबतच आफ्रिकन अजगरही (पायथॉन) ठेवला होता. हाच अजगर या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला.सोमवारी सकाळी बार्थ बंधूच्या मित्राचे वडील व दुकानाचे मालक सॅव्होई मुलांना उठवण्याकरिता गेले असता मुले मृतावस्थेत आढळली. शेजारीच हा अजगर बसलेला होता. त्याला पकडल्यानंतर मारून टाकण्यात आले. शनिवारी कॅम्पबेल्टनच्या सेंट थॉमस कॅथॉलिक चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेनंतर मुलांचा दफनविधी करण्यात आला. त्या वेळी हजारो शोकाकुल नागरिक उपस्थित होते.

शहारे आणणारी घटना
आफ्रिकन अजगराला काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. त्या बॉक्सला असलेल्या छिद्रातून तो हळूच सटकला. छिद्रातून बाहेर पडल्यावर पाइपच्या साहाय्याने तो दुसर्‍या मजल्यावर गेला. छतावर सरपटत असताना पाइप फुटला व अजगर थेट बेडरूममध्ये पडला. तिथे नोहा व कॉनर झोपलेले होते.

बेडरूममधील थरार
अजगर पडताच त्याने दोघांपैकी (बहुतेक धाकटा नोहा ) एकाला विळखा घातला. त्याला वाचवताना कॉनरलाही त्याने आपल्या अजगरी मिठीत घेतले असावे. ही दोन्ही मुले रविवारी इतर पाळीव प्राण्यांसोबत खेळली असल्याने अजगराने त्यांच्या शरीराला असलेल्या वासामुळे पकडले असावे, असे कॅनडातील सर्पतज्ज्ञांचे म्हणणे आहे.