आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप सोबत घेऊन विमानप्रवास करणार्‍या प्रवाशाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- सुरक्षा यंत्रणेला चकमा देत सापाची तस्करी करणार्‍या एका प्रवाशाला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. इस्रायलच्या इजी जेट विमानसेवा कंपनीचे विमान इस्रायलहून अमेरिकेकडे जात होते. या विमानात एक प्रवासी बसला होता. त्याच्याकडे कार्डबोर्डचे एक बॉक्स होते. त्या बॉक्सबद्दल सुरक्षा अधिकार्‍यांना संशय आला. त्यामुळे त्याची तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

परंतु सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देत या प्रवाशाने सापाला या बॉॅक्समध्ये टाकले. प्रवासादरम्यान चालक दलातील एका सदस्याला त्या बॉक्समध्ये साप ठेवले असल्याचे निदर्शनास आले. सदस्याने लगेच बेडफोर्डशायर पोलिसांना याची माहिती कळवली.

लंडनच्या ल्युटोन विमानतळावर विमान पोहोचताच पोलिसांनी प्रवाशाला ताब्यात घेतले. साप बॉक्समध्ये असल्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता, असे इजी जेट विमान कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या प्रवाशाने हा प्रकार कशासाठी केला, याचा अंदाज घेण्यासाठी अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.