आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरदस्त हिमवर्षावानंतर अमेरिकेत आणीबाणीची घोषणा, 6 हजार 500 विमानांचे उड्डाण रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: न्यूयॉर्क
न्यूयॉर्क - ईशान्य अमेरिकेत हिमवर्षामुळे आणीबाणी घोषित करण्‍यात आली आहे. साडे सहा हजार उड्डाण रद्द केली गेली आहे. फ‍िलाडेल्फ‍िया आणि न्यूयॉर्कसह पूर्व भागात ऐतिहासिक हिमवादळाचे संकट उद्भवले आहे. न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार 11 वाजल्यानंतर 6 हजार मैल लांबीच्या रस्त्यांवर वाहनांच्या आवाजांवर बंदी घालण्‍यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वे आणि बस सेवाही बंद करण्‍यात आली आहे.

न्यूयॉर्कच्या काही भागात कडाक्याची थंडी पडण्‍याची शक्यता आहे, असे न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लेसियो यांनी व्यक्त केले आहे. दिवसभर झालेल्या जबरदस्त हिमवर्षावामुळे भयानक हिमवादळ येण्‍याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला. न्यूयॉर्कसह न्यूजर्सी, कनेक्टीकट, रोड आयलँड आणि मॅसेच्युसेट्समध्‍ये आणीबाणी लागू करण्‍यात आली आहे.
न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमोने मंगळवारी प्रवाशांवर बंदी घातली आहे. मात्र 13 प्रांतांमध्‍ये आपात्कालीन वाहन चालवण्‍यासाठी सूचना देण्‍यात आले आहे. कनेक्टीकट आणि मॅसेच्युसेट्समध्‍ये वाहन चालवण्‍यासाठी प्रतिबंध करण्‍यात आले आहे. रहिवाशांना घरातच राहण्‍याची विनंती केली आहे. जर 11 वाजल्यानंतर एखादी गाडी रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्‍यात येईल, प्रशासनाने बजावले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मॅसेच्युसेट्सच्या समुद्रकिनारी भागात 129किमी/तासापेक्षा जास्त वेगाने हिमवा-यांचे वेग असेल. येथील परिस्थिती खूप भयावह होऊ शकते, असे राष्‍ट्रीय हवामान सेवेच्या ग्लेग फील्ड यांनी सांगितले आहे. एक ते पाच वाजण्‍याच्या सुमारास 15 इंच हिमवर्षाव होऊ शकतो अशी शंका फील्ड यांनी व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्क
फेब्रुवारी
महिना वर्ष किती हिमवर्षाव झाला
2006 26.9 इंच (68.3 सेमी)
डिसेंबर 1947 26.4 इंच (67.1 सेमी)
मार्च 1888 21.0 इंच (53.3 सेमी)
फेब्रुवारी 2010 20.9 इंच (53.1 सेमी)
स्रोत: न्यूयॉर्क सरकार
बोस्टन
महिना वर्ष किती हिमवर्षाव झाला
फेब्रुवारी 2003 27.5 इंच (69.9 सेमी)
फेब्रुवारी 1978 27.1 इंच (68.8 सेमी)
फेब्रुवारी 1969 26.3 इंच (66.8 सेमी)
मार्च 1997 25.4 इंच (64.5 सेमी)
फेब्रुवारी 2013 24.9 इंच (63.2 सेमी)
स्रोत: नॅशनल वेदर सर्व्हिस
पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा ईशान्य अमेरिकेतील ह‍िमवर्षावानंतर तयार झालेली स्थिती....