आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेनेझुएला, निकारागुआची कवाडे स्नोडेनसाठी खुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या नाकावर टिच्चून दक्षिण अमेरिकेतील दोन इवलेसे देश व्हेनेझुएला आणि निकारागुआ यांनी अमेरिकी हेरगिरीविरोधात आवाज उठवणार्‍या एडवर्ड स्नोडेनला राजाश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी ही घोषणा केली. स्नोडेन सध्या मॉस्कोत अडकून पडला आहे. मात्र, स्नोडेनला आश्रय देऊ नका असा दम अमेरिकेने दोन्ही देशांना भरला आहे.

गेल्या रविवारी हाँगकाँगहून रशियाला अलगद निसटणारा स्नोडेन याने मॉस्कोच्या शेरेमेत्येवो विमानतळावर मुक्काम ठोकला आहे. जगातील राजकारण्यांची झोप उडवणारी वेबसाइट ‘विकिलीक्स’ स्नोडेनला मदत करीत आहे. अमेरिकेने स्नोडेनवर हेरगिरी, सरकारी मालमत्तेची चोरी व गोपनीय माहिती फोडल्याचे गंभीर आरोप ठेवले आहेत. अमेरिकेच्या कारवाईपासून बचावासाठी त्याने भारतासह अनेक देशांना आश्रयासाठी विनंती केली होती. परंतु ती फेटाळण्यात आली. शुक्रवारी निकारागुआ आणि व्हेनेझुएला त्याला राजाश्रय देणार आहेत. त्यामुळे अमेरिकेची घोर निराशा झाली आहे. तो मायदेशी परतण्याची शक्यताही निवळली आहे.

साम्राज्यवादी अत्याचार साम्राज्यवादाच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी स्नोडेनला मानवतावादी दृष्टिकोनातून आश्रय देण्याचा निर्णय बोलिव्हेरियन प्रजासत्ताकाच्या सरकारने घेतला आहे, अशी घोषणा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांनी शुक्रवारी केली.

पश्चात्तापी तरुणाला मदत
अमेरिका व त्याच्या युरोपियन सहकारी राष्ट्रांकडून हेरगिरीसाठी तंत्रज्ञानाचा वापर होतोय हे पाहून पश्चात्ताप झालेल्या स्नोडेनला मदत करण्याचा आमचा सार्वभौम हक्क आहे. निकारागुआत त्याचे स्वागत आहे, असे राष्ट्राध्यक्ष डॅनियल ऑर्टेगा यांनी सांगितले.

आश्रय कशामुळे
स्नोडेन असल्याच्या संशयावरून बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरालेस यांच्या विमानाला मंगळवारी युरोपियन देशांनी हवाई मार्ग बंद केले होते. त्यांना बळजबरीने ऑस्ट्रियाला उतरावे लागले होते.राष्ट्राध्यक्षाचा हा अपमान आफ्रिकी व दक्षिण अमेरिकी देशांच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच स्नोडेनला आश्रय देण्याचा घेण्यात आला.