आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Snowden Not Behind The NSA Leakage To The Independent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्नोडेनचे लिकेज सापडेना, अधिकारी बुचकाळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या हेरगिरी कार्यक्रमाची गुपिते जगजाहीर करणारा कॉन्ट्रॅक्टर एडवर्ड स्नोडेनने संवेदनशील माहिती नेमकी मिळवली कशी, याचा छडा लावण्यात तपास अधिकारी अद्यापही यशस्वी झालेले नाहीत. स्नोडेनच्या कृत्याचे बिंग फुटत नसल्याने राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे अधिकारी बुचकाळ्यात पडले आहेत.

हेरगिरीसंबंधीची माहिती स्नोडेन अतिशय चाणाक्षपणे मिळवली. माहिती मिळवताना त्याने कोणत्या डिजिटल मार्गाचा किंवा साधनाचा वापर केला, याचा साधा पुरावादेखील सोडला नाही. त्यामुळे स्नोडेनने नेमकी कोणत्या स्वरूपाची व माहितीचा किती संग्रह केला आहे, याचा अंदाजदेखील तपास अधिका-यांना लावणे कठीण झाले आहे. खरे तर निगराणी कार्यक्रमावर नियंत्रण करणारी सुरक्षा अत्यंत कडक असल्याचा प्रशासनाचा आजवर समज होता. तो स्नोडेन प्रकरणाने पार पुसून गेला आहे. संवेदनशील माहिती जाहीर करण्यासाठी एका कडक प्रक्रियेतून जावे लागते. त्यानंतरच माहिती जाहीर करण्याची परवानगी दिली जाते. परंतु आता मात्र एनएसएच्या निगराणी कार्यक्रमाची संवेदनशील माहिती पुन्हा हॅक केली जाऊ शकते, यावर अधिका-यांनी विचार-मंथनाला सुरुवात केली आहे. त्यासाठी गोपनीय यंत्रणेच्या सुरक्षेवर फेरविचार केला जाऊ लागला आहे. एनएसएमधील आणखी किती कर्मचारी किंवा कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारची हॅकिंग करू शकतात, यावरून डेटा सुरक्षेवर नव्याने प्रकाश टाकला जात आहे.

तोरा उतरला : स्नोडेनने गोपनीय माहिती चोरली आहे. त्याने किती व कोणत्या स्वरूपाची माहिती चोरली, याची सविस्तर कल्पना असल्याचा दावा एनएसएचे संचालक केथ अलेक्झांडर यांनी जुलै महिन्यात केला होता. स्नोडेनने माहिती फोडल्याच्या दोन महिन्यांनंतर संचालकांनी असे वक्तव्य केले होते. स्नोडेनने डाऊनलोड केलेल्या तपशिलाची माहिती असल्याचे केथ यांचे म्हणणे होते. परंतु आता एनएसएची घाबरगुंडी उडाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर एनएसएच्या प्रवक्त्या व्हॅनी व्हिन्स यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अलेक्झांडर यांची बाजू घेतली. स्नोडेनने काय हॅक केले असू शकते, याची केवळ जुजबी माहिती असल्याचे अलेक्झांडर यांना म्हणायचे होते, असे व्हॅनी यांनी सांगितले.