आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Snowden Once Again Escaped From American Activity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्नोडेनचा अमेरिकेला पुन्हा गुंगारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - अमेरिकेच्या हेरगिरी कार्यक्रमाची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारा लिकर एडवर्ड स्नोडेन गुरुवारी मॉस्को विमानतळावरून सटकला. जून महिन्यापासून तो विमानतळ परिसरात होता. अखेर त्याला रशियाकडून तात्पुरत्या स्वरूपातील राजाश्रय देण्यात आला आहे. त्यामुळे रशियाच्या आडून अमेरिकेला पुन्हा एकदा गुंगारा देण्यात स्नोडेन यशस्वी ठरला आहे.

शेरेमेत्योव विमानतळाच्या ट्रान्झिट विभागाकडून रशियाच्या इतर भागांत जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे स्नोडेनला मिळाली आहेत, असे स्नोडेनचे वकील अँनातॉली कुशेरेना यांनी सांगितले. दुपारी साडेतीनच्या सुमारास स्नोडेन विमानतळावरून रवाना झाला. तो बाहेर पडत असल्याची कल्पना विमानतळावरील कर्मचार्‍यांना देखील नव्हती. विकिलिक्सचे सारा हॅरिसन त्याच्या केअरटेकर आहेत. हॅरिसन या विकिलिक्सच्या कायदा तज्ज्ञ टीमच्या सदस्य आहेत. त्यांच्याकडून स्नोडेनला सर्वतोपरी मदत मिळू लागली आहे. स्नोडेनला अस्थायी स्वरूपाचा राजार्शय मिळाला आहे का, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याला अस्थायी स्वरूपाची परवानगी मिळाली असेल तर त्याला एक वर्षासाठी देशात राहता येणार आहे. त्यानंतर पुन्हा तो राजार्शयासाठी अर्ज करू शकतो. स्नोडेनला राजार्शय मिळाल्यामुळे अमेरिका तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देऊ शकते. कारण अमेरिकेने या प्रकरणी रशियाचे मन वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. स्नोडेनला मृत्युदंड दिला जाणार नाही, याची ग्वाही अँटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी दिली होती.

मुक्काम कोठे ?
सध्या तरी स्नोडेनला रशियाकडून आर्शय मिळाल्याचे सांगता येईल, परंतु तो देशात नेमके कोठे जाईल याचा निर्णय स्वत:च घेणार आहे. त्याचे मुक्कामाचे ठिकाण जाहीर करता येणार नाही. त्यामागे सुरक्षेचे कारण आहे. स्नोडेनचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. असा सर्वाधिक प्रयत्न झालेला तो जगातील एकमेव व्यक्ती आहे, असे अँनातॉली कुशेरेना यांनी सांगितले. कुशेरेना हे स्नोडेनचे वकील आहेत.


23 जूनपासून गुंगारा
स्नोडेनने अमेरिकेशी संबंधित माहिती उजेडात आणल्यानंतर हाँगकाँगहून मॉस्को गाठले होते. त्यानंतर जगभरात राजकीय तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


काय आहेत आरोप ?
गोपनीय कार्यक्रमाची माहिती, सरकारी मालमत्तेची चोरी आणि सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती जाहीर केल्याचा ठपका अमेरिकेने स्नोडेनवर ठेवला आहे.

05 जून- अमेरिकेच्या हेरगिरीची माहिती पहिल्यांदा ‘गार्डियन’मध्ये प्रकाशित. एनएसएकडे लाखो अमेरिकींचे दूरध्वनी रेकॉर्ड.
06 जून- प्रीझम कार्यक्रमाचा तपशील चव्हाट्यावर
09 जून- एडवर्ड स्नोडेनच्या विनंतीवरून ‘गार्डियन’मध्ये लिकिंगचा सोर्स अर्थात स्नोडेनचे नाव जाहीर.
014 जून- स्नोडेनविरुद्ध अमेरिकेकडून गुन्हा दाखल
023 जून-हाँगकाँगमधून मॉस्कोच्या दिशेने. एक्वाडोरला विनंती.
02 जुलै -बोलिव्हिएन नेते एव्हो मोराल्स यांच्या विमानाकडून स्नोडेनचा शोध
06 जुलै- बोलिव्हिया, व्हेनेझुएला, निकारागुआ यांच्याकडून ऑफर.
012 जुलै- स्नोडेनची पत्रकार परिषद. रशियाला राजार्शयासाठी विनंती.
01 ऑगस्ट- रशियाकडून राजार्शयासाठी परवानगी.