आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन हेरगिरी उघड करणारा स्नोडेनला हवा रशियातच आश्रय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - अमेरिकेचा गुप्तचर एजंट एडवर्ड स्नोडेनने रशियामध्ये आश्रय घेण्याची आपली इच्छा असल्याचे मॉस्को विमानतळावर मानवी हक्क संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले. स्नोडेनला रशियातच राहायची इच्छा आहे, असे ह्यूमन राइट्स वॉचची प्रतिनिधी तान्या लोकशिना हीने इंटरफॅक्स वृत्तसंस्थेला सांगितले. 23 जून रोजी स्नोडेन हाँगकाँगहून मॉस्कोत आला होता. तेव्हापासून तो विमानतळावरच आहे. तिकडे स्नोडेनला आश्रय देण्याच्या मुद्द्यावर लॅटिन अमेरिकी देश अमेरिकेला सडेतोड उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.

जगातील प्रत्येक नागरिकाच्या आश्रय मागण्याच्या हक्काचा जागतिक समुदायाने आदर केला पाहिजे. त्याला तुम्ही काहीही नाव देऊ शकता. आम्ही धमक्या, सुडाच्या भावनेतून कारवाई किंवा परिणामांची पर्वा न करता आमचा अधिकार वापरणार आहोत, असे व्हेनेझुएलाचे परराष्ट्रमंत्री इलियास हौआ यांनी म्हटले आहे.