आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या हे‍रगिरीचे बिंग फोडणारा स्नोडेन मॉस्कोत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - अमेरिकी हेरगिरीविरोधात रणशिंग फुंकणारा ‘जागल्या’ (व्हिसल ब्लोअर) एडवर्ड स्नोडेन मॉस्कोतच असून त्याला अमेरिकेच्या हवाली करणार नाही, अशी घोषणा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी केली आहे. स्नोडेनला हवाली न केल्यास विपरित परिणाम होतील, अशी धमकी अमेरिकेने रशियाला दिली होती.त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून ही घोषणा केली आहे.


स्नोडेनच्या संबंधात पुतीन यांनी प्रथमच भाष्य केले आहे. स्नोडेन हा मुक्त आहे. तो मॉस्कोत आल्यामुळे रशियन अधिका-यांनाही आश्चर्य वाटल्याचे पुतीन म्हणाले. ते सध्या फिनलँड दौ-यावर आहेत. स्नोडेन रशियात आहे. पण तो ट्रांझिट पॅसेंजर (अस्थायी प्रवासी, तात्पुरता थांबलेला) आहे. त्याने देशाच्या सरहद्दीचे उल्लंघन केले नाही. तो विमानतळावरील ट्रांझिट हॉलमध्ये थांबला आहे. असे पुतीन यांनी सांगितले. दरम्यान, स्नोडेनसाठी इक्वेडोरने निर्वासिताची कागदपत्रे जारी केले. मात्र त्याला राजाश्रय दिला नसल्याचेही सांगितले. इक्वेडोरचे परराष्ट्रमंत्री रिकार्दो पॅतिनो यांनीही कानावर हात ठेवले. तो नेमका कुठे आहे ते माहीत नाही असे ते म्हणाले.