आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sochi Olympics Opening Ceremony Latest News Update In Marathi

SOCHI OLYMPICS: उद्‍घाटन समारंभात झाल्‍या चूका, रशियाच्‍या माध्‍यमांनी बदलले फुटेज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोची (रशिया): 22 व्‍या हिवाळी ऑलिम्पिकचे थाटात उद्‍घाटन झाले. मात्र त्‍यामध्‍ये एक मोठी चूक झाली. धूर आणि काचेच्‍या साह्याने ऑलिम्पिकच्‍या पाच रिंग दाखविण्‍याचा प्रयत्‍न फसला. पाच ऐवजी चारच रिंग तयार झाल्‍या. परंतु रशियाच्‍या सरकारी दुरचित्रवाहिन्यांनी सोहळ्याचे प्रत्‍यक्ष चित्रण दाखवताना मात्र अत्‍यंत चतुराईने हे दृश्‍य टाळले. त्‍यांनी चित्रफितीत बदल करुन ती दाखविली.

आयोजकांच्‍या चूकीमुळे सोशल साइट्सवर जगभरामध्‍ये रशियाची खिल्‍ली उडविली जात आहे.

कशी झाली चूक

आयोजकांनी काच आणि धूराच्‍या साहाय्याने ऑलिम्पिकच्‍या रिंग बनविताना त्‍यातील चारच रिंग तयार झाल्‍या. पाचवी रिंग तयार झालीच नाही. ऑलिम्पिकचे प्रतिक असणा-या या पाच रिंग पूर्ण न झाल्‍याचे चित्रण, जगभरातील सर्व माध्‍यमांमध्‍ये दाखविले गेले. परंतु रशियाच्‍या माध्‍यमांमध्‍ये या चुकीवर पडदा टाकण्‍याचे काम केले.''ईश्‍वराची कृपा ही चूक टी. व्‍ही.वर दाखवली गेली नाही'' असे उद्गार आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीचे संयोजक प्रमुख जीन क्‍लाऊड यांनी कार्यक्रमानंतर काढले.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, ऑलिम्पिकमधील उद्‍घाटन समारंभात झालेल्‍या चूका....