आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम‍ाजिक शिष्‍टाचार, सभ्‍यतेचे धडे आता शिकवणार संगणक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - सामाजिक शिष्टाचार, सभ्यता शिकवण्यासाठी शास्त्रज्ञांनी स्वयंचलित संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रोग्रामला एमएसीएच (माय ऑटोमॅटिक कन्व्हर्शन कोच) नाव देण्यात आले आहे.

स्वमग्नतेमुळे ज्यांना समाजात मिसळण्यात अडचणी येतात किंवा सोशल फोबियाची समस्या आहे, अशा नागरिकांसाठी एमएसीएच प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील शास्त्रज्ञांनी ही प्रणाली विकसित केली आहे. संगणक युर्जसच्या संभाषणाचे विश्लेषण करून वर्तनाशी संबंधित संकेत देईल. संगणक कच्च्या भाषेतील उणिवा शोधून त्यात दुरुस्ती सुचवेल. बोलताना एम किंवा बेसिकली शब्दांचा योग्य उच्चार सुचवला जाईल. यानंतर भाषेतील सुधारणेची संगणकाकडून नोंद घेतली जाईल.